पौष्टिक लाडू - पाककृती

पौष्टिक लाडू, पाककला - [Paushtik Ladoo, Recipe].
पौष्टिक लाडू - पाककृती | Paushtik Ladoo - Recipe

पौष्टिक लाडू


पौष्टिक लाडू बनविण्यास सोपा असतो तसेच अनेक दिवस टिकू शकतो.पौष्टिक लाडू करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • एक वाटी शेंगदाणे
  • पाव वाटी खजूर
  • पाऊण वाटी गूळ

पौष्टिक लाडू करण्याची पाककृती


  • शेंगदाणे भाजून त्याचे बारीक कूट करा.
  • या कुटामध्ये किसलेला गूळ व खजुराचे छोटे तुकडे टाका.
  • मिश्रण एकत्र करा.
  • या मिश्रणाला गरम करावे लागत नाही.
  • यानंतर मिश्रणाचे छोटे छोटे लाडू बनवा.
  • पौष्टिक लाडू खाण्यासाठी तयार होतात.
  • हीच कृती वापरुन तुम्ही खजूर व शेंगदाण्याऐवजी नाचणी, गहू - बेसन, मुगाच्या डाळीचा रवा वापरून पौष्टिक लाडू बनवू शकता.

पौष्टिक लाडू

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.