पालेभाज्यांचे वडे - पाककृती

पालेभाज्यांचे वडे, पाककला - [Palebhajyanche Vade, Recipe].
पालेभाज्यांचे वडे - पाककृती | Palebhajyanche Vade - Recipe

पालेभाज्यांचे वडे


पालेभाज्यांचे वडे



पालेभाज्यांचे वडे करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • एक वाटी बारीक चिरलेला पालक
  • एक वाटी बारीक चिरलेला कोबी
  • एक वाटी बारीक चिरलेली मेथी
  • एक वाटी कोरडा भाजलेला रवा
  • एक वाटी भाजलेल्या हरभर्‍याच्या डाळीचे पीठ
  • एक छोटा चमचा आले - लसूण पेस्ट
  • दोन - तीन हिरव्या मिरच्या
  • चिमुटभर हिंग
  • एक छोटा चमचा लिंबूरस
  • तळण्यासाठी तेल

पालेभाज्यांचे वडे करण्याची पाककृती


  • प्रथम आले, लसूण, मिरची, हिंग हे सर्व एकत्र बारीक वाटून घ्या.
  • पालक, कोबी, मेथी, रवा, डाळीचे पीठ हे साहित्य एकत्र मिसळून यामध्ये सर्व वाटलेले पदार्थ मिसळा.
  • त्यात लिंबाचा रस आणि पाणी घालून मळून घ्या.
  • कुकरमधील डब्याला तेलाचा हात लावून सुरळ्या डब्यात ठेवा.
  • कुकरमध्ये पाणी घालून डब्यातील सुरळ्या वाफवून घ्या.
  • कुकर नसल्यास चाळणीत ठेवून वाफवून घ्या.
  • गार झाल्यावर त्याचे काप करून तळा किंवा फोडणीवर परता.

पालेभाज्यांचे वडे

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.