पालक पराठा
रोज रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा आल्यास पालक घालून केलेला पराठा खाल्ला असता जेवणात बदल होईल.
पालक पराठा करण्यासाठी लागणारा जिन्नस
- दोन वाट्या चिरलेला पालक
- एक वाटी गव्हाचे पीठ
- पाव वाटी हरभरा डाळीचे पीठ
- ३ - ४ हिरव्या मिरच्या
- वाटलेला लसूण
- चवीनुसार मीठ
- अर्धा छोटा चमचा जीरेपूड
- तेल
पालक पराठा करण्याची पाककृती
- पालक मऊ वाफवून घ्या. (आवडत असल्यास कच्चाही चालेल)
- त्यामध्ये गव्हाचे पीठ आणि डाळीचे पीठ मिसळा.
- वाटलेली हिरवी मिरची, मीठ, वाटलेला लसूण व जीरेपूड घाला.
- पीठ घट्ट मळा व पोळीप्रमाणे पीठ भिजवतांना एक चमचा तेल घाला.
- पीठ एक तास भिजत ठेवा.
- पीठाचे छोटे गोळे करून चपातीप्रमाणे लाटून तव्यावर भाजा व कडेने तेल सोडा.
- चटणीसोबत गरम खायला द्या.
पालक पराठा
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली पाककला