पालक भजी
पालकाच्या पानांप्रमाणेच कुठल्याही पालेभाज्या, ओव्याची पाने, विड्याची पाने, चिरलेली अळूची पाने यांची भजी तयार करता येतात.
पालक भजी करण्यासाठी लागणारा जिन्नस
- पालकची पाने
- एक वाटी हरभरा डाळीचे पीठ
- चवीनुसार तिखट
- चवीनुसार मीठ
- पाव छोटा चमचा हळद
- अर्धा चमचा जीरे
- अर्धा चमचा ओवा
- तळण्यासाठी तेल
पालक भजी करण्याची पाककृती
- हरभरा डाळीच्या पिठामध्ये तिखट, मीठ, ओवा व पाणी घालून भज्याच्या
- पिठासारखे भिजवा.
- पालकाची पाने निवडून धुवून घ्या.
- आता डाळीच्या पिठात प्रत्येक पान बुडवून गरम तेलात तळा.
- गरमागरम सर्व्ह करा.
पालक भजी
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली पाककला