शिंगाडा पिठाच्या चकल्या
शिंगाडा पिठाच्या चकल्या
शिंगाडा पिठाच्या चकल्या करण्यासाठी लागणारा जिन्नस
- शिंगाड्याचे पीठ
- ४ - ५ हिरव्या मिरच्या
- जीरेपूड
- आवडीप्रमाणे ताक
- चवीनुसार मीठ
शिंगाडा पिठाच्या चकल्या करण्याची पाककृती
- जेवढे पीठ असेल त्यापेक्षा थोडे कमी पाणी घेऊन उकळण्यास ठेवा.
- उकळी झाली की त्यात ताक, ठेचलेल्या हिरव्या मिरच्या, मीठ आणि जीरेपूड घाला.
- नंतर शिंगाड्याचे पीठ घालून ढवळा व उतरवून ठेवा.
- थोड्या वेळाने मळून चकल्या करा व गरमागरम खायला द्या.
- ह्या चकल्या अगदी आयत्या वेळी व थोड्याच करायच्या असल्याने प्रमाणाची जरूर नाही.
शिंगाडा पिठाच्या चकल्या
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली पाककला