रवा बेसन लाडू - पाककृती

रवा बेसन लाडू, पाककला - [Rava Besana Ladoo, Recipe].
रवा बेसन लाडू - पाककृती | Rava Besana Ladoo - Recipe

रवा बेसन लाडू


रवा बेसन लाडूरवा बेसन लाडू करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • ४ वाट्या बारीक रवा
 • १ वाटी डाळीचे जाडसर पीठ
 • ४ वाट्या साखर
 • १ वाटी डालडा तूप
 • ७ - ८ वेलदोड्यांची पूड
 • अर्ध्या जायफळाची पूड

रवा बेसन लाडू करण्याची पाककृती


 • तुपावर रवा व डाळीचे पीठ वेगवेगळे भाजून घ्यावे.
 • कधीही दोन्ही एकत्र करून भाजू नये.
 • भाजून झाल्यावर दोन्ही एकत्र करा.
 • साखरेत २ वाट्या पाणी घालून एकतारी पाक करा.
 • नंतर पाकात भाजलेला रवा व डाळीचे पीठ घालून घोटा.
 • वेलदोड्यांची पूड व जायफळाची पूड घालावी व मिश्रण झाल्यावर लाडू वळावे.

रवा बेसन लाडू

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.