मराठीचे भवितव्य - मराठी कविता

मराठीचे भवितव्य, मराठी कविता - [Marathiche Bhavitavya, Marathi Kavita] राजभाषा मराठी माझी मायबोली, संस्कृत भाषेपासून उदयाला ती आली.
मराठीचे भवितव्य - मराठी कविता | Marathiche Bhavitavya - Marathi Kavita

राजभाषा मराठी माझी मायबोली

राजभाषा मराठी माझी मायबोली
संस्कृत भाषेपासून उदयाला ती आली

माय मराठी तुझ्यापुढे गाते मी रडगाणी
अमृताहूनी गोड अशी तुझी हरवत चालली वाणी

महाराष्ट्राच्या राजभाषेवर थाट मांडला इंग्रजीने
साथ दिली त्या इंग्रजीला महाराष्ट्रातल्याच माणसाने

कोण जाणे काय होईल माय मराठीचे
राजेशाहीला शोभणाऱ्या मराठीच्या अस्तित्वाचे

नऊ-दहा वर्षात नष्ट होईल मराठीचे अस्तित्व
कधी कळणार या पिढीला मायबोलीचे महत्व

महाराष्ट्राची संस्कृती जपत वाचवले पाहिले मराठीला
त्यासाठी जर सुरूवात आपण केली तर येतील सर्व सोबतीला

ज्ञानाच्या व शब्दांच्या अफाट शक्तीवार घडवू मराठीचे भवितव्य
त्यासाठी शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनो या करायला सहाय्य

जागा हो रे माणसा तू मराठीला दाद दे!
मराठी भाषेचा गोडवा जपत तू संस्कृतीला साथ दे!

- सिद्धी भालेराव

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.