कॉर्नफ्लेक्सचा चिवडा
कॉर्नफ्लेक्सचा चिवडा
कॉर्नफ्लेक्सचा चिवडा करण्यासाठी लागणारा जिन्नस
- २५० ग्रॅम कॉर्नफ्लेक्सचे (मक्याचे) पाकीट
- दीड वाटी भाजून सोललेले शेंगदाणे
- १ वाटी डाळे
- १ वाटी खोबऱ्याचे काप
- थोडेसे काजू व बेदाणे
- ८ - १० हिरव्या मिरच्यांचे तुकडे
- १ चमचा गरम मसाला
- मीठ
- साखर
- हिंग
- हळद
- मोहरी
- तेल
कॉर्नफ्लेक्सचा चिवडा करण्याची पाककृती
- तेलाची हिंग, मोहरी, हळद घालून फोडणी करावी.
- त्यात मिरच्याचे तुकडे घाला.
- खोबऱ्याचे काप घाला.
- खोबऱ्याचे काप बदामी रंगाचे झाले की दाणे व डाळे घाला.
- चांगले ढवळून मीठ, साखर व गरम मसाला घाला.
- काजू व बेदाणे घाला.
- आता त्यात कॉर्नफ्लेक्स घालून ढवळा.
- तयार आहे कॉर्नफ्लेक्स चिवडा.
- कॉर्नफ्लेक्स तळावे लागत नाहीत.
कॉर्नफ्लेक्सचा चिवडा
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली पाककला