पाकातले बेसनचे लाडू - पाककृती

पाकातले बेसनचे लाडू, पाककला - [Pakatale Besanche Ladoo, Recipe].
पाकातले बेसनचे लाडू - पाककृती | Pakatale Besanche Ladoo - Recipe

पाकातले बेसनचे लाडू


पाकातले बेसनचे लाडूपाकातले बेसनचे लाडू करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • २ वाट्या डाळीचे पीठ
  • १ वाटी साखर
  • ३-४ वेलदोड्यांची पूड
  • १ चमचा खडीसाखरेची जाडसर पूड
  • १ वाटी तूप

पाकातले बेसनचे लाडू करण्याची पाककृती


  • नेहमीप्रमाणे तुपावर डाळीचे पीठ भाजून घ्या.
  • छान वास आला की त्यावर थोडेसे गरम दूध शिंपडा.
  • साखरेत अर्धी पाणी घालून एकतारी पाक करावा.
  • त्यात भाजलेले बेसन घालावे. ढवळावे.
  • वेलदोड्याची व खडीसाखरेची पूड घालावी व मिश्रण घट्ट झाले की लाडू वळावे.

पाकातले बेसनचे लाडू

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.