मटर पुलाव
मटर पुलाव
मटर पुलाव करण्यासाठी लागणारा जिन्नस
- १ कप बासमती तांदुळ
- १ कप हिरवे मटार
- २ कप पाणी
- २ मोठे चमचे तूप
- २ लवंग
- कापलेला टोमॅटो
- १ कापलेला कांदा
- तेजपान
- २ छोटी वेलची
- १/२ चमच जीरे
- १/२ चमच गरम मसाला
- मीठ
मटर पुलाव करण्याची पाककृती
- सर्वात आधी तांदुळ पाण्यात भिजवावे.
- तीन मिनिटानंतर तांदळातील पाणी काढून टाकावे.
- एका भांड्यात तूप गरम करून कांदा लालसर भाजावा.
- तुपामध्ये लवंग, तेजपान, विलायची आणि जीरे टाकुन दोन मिनीट फ्राय करावे.
- आता मटार, टोमॅटो, गरम मसाला आणि मीठ टाकुन २ - ३ मिनीट फ्राय करून तांदुळ टाकावे.
- २ मिनीटानंतर २ कप पाणी टाकावे आणि गॅस कमी करून पाणी संपेपर्यंत शिजवावे.
- पाणी संपल्यानंतर गॅस बंद करावा.
- वरून कोथिंबीर पसरावी.
- तयार मटर पुलाव कोशिंबीर, रायत्यासोबत वाढावा.
मटर पुलाव
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली पाककला