रसगुल्ला
रसगुल्ला
रसगुल्ला करण्यासाठी लागणारा जिन्नस
- दीड लीटर दूध
- ३ वाट्या पाणी
- अर्धा चमचा रोझ इसेन्स
- २ चमचे मैदा
रसगुल्ला करण्याची पाककृती
- दुधाला उकळी आली की त्यात अर्धा लिंबाचा रस व थोडी तुरटीची पूड घालून दूध नासवून घ्यावे.
- ते दूध एका कपड्यावर ओतून पुरचुंडीप्रमाणे बांधून ठेवावे.
- सर्व पाणी निथळू द्यावे, हाताने पिळू नये.
- अशा रितीने पनीर करावे.
- नंतर पनीर मळूने घ्या.
- त्यात मैदा घालून मळावे.
- आता त्याचे सुपारीएवढे गोळे करावे.
- साखरेत ५ कप पाणी घालून उकळावे.
- उथळ पातेल्यात करावे.
- नंतर त्यात वरील गोळे घालून मंदाग्नीवर थोडा वेळ उकळू द्यावे.
- रसगुल्ले तरंगू लागले की पाकात रोझ इसेन्स घालावा.
रसगुल्ला
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली पाककला