वैचारिक षंढ - मराठी कविता

वैचारिक षंढ, मराठी कविता - [Vaicharik Shandh, Marathi Kavita] आम्ही मुळातच वैचारिक षंढ, म्हणून टाळतोच हर एक बंड.
वैचारिक षंढ - मराठी कविता | Vaicharik Shandh - Marathi Kavita

आम्ही मुळातच वैचारिक षंढ, म्हणून टाळतोच हर एक बंड

आम्ही मुळातच वैचारिक षंढ
म्हणून टाळतोच हर एक बंड

चाकरीतून मिळत असे भाकर
कुठून येणार लाथाडण्याच बळ
आम्ही मुळातच वैचारिक षंढ
म्हणून जमवितच बसतो फंड

अजुनही ऐकतो श्रावण बाळ
पुत्र असावा राम हीच शिकवण
आम्ही मुळातच वैचारिक षंढ
म्हणून नसतोच अंगी अगरगंड

वळणावरी भेटे कोणी सोज्वळ
ज्यास दिसते आपल्यात खुसपट
आम्ही मुळातच वैचारिक षंढ
म्हणून नेहमीच रहातो थंड

आताही शिकवले जाते आम्हास
धर्मश्रेष्ठ, देशप्रेम अन समाज
आम्ही मुळातच वैचारिक षंढ
म्हणून बांधून घेतो साखळदंड

मनावरी उठलेले हेच ते वळ
सांगत फिरतो जपायचे आपणं
आम्ही मुळातच वैचारिक षंढ
म्हणून कुढत बसतो अखंड

- प्रविण पावडे

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.