हैवान - मराठी कविता

हैवान, मराठी कविता - [Haiwan, Marathi Kavita] आयुष्यभर बळी घेतले आपल्यांचे, तरीही त्याचे भागत नाही.

आयुष्यभर बळी घेतले आपल्यांचे, तरीही त्याचे भागत नाही

साप सापा सारखाच वागतो
माणुस मानसा सारखा वागत नाही
आयुष्यभर बळी घेतले आपल्यांचे
तरीही त्याचे भागत नाही

कुणाच्या स्वप्नांची राख
कुणाच्या छातीवर पाय
महान होण्याच्या मार्गावर
हाच पहिला अध्याय
संच त्याचे आभाळालग
कोणी काहीच मागत नाही
तरीही त्याचे भागत नाही

मनी काही भाळ कुठे
ध्यानी कोणते नाव कुठे
दया कुठे प्रेम कुठे
देवाच्या कृपेला आईच्या उबेला
कशालाही जागत नाही
तरीही त्याचे भागत नाही

मना मध्ये कारस्थाने
विचारात मळ
एकाचा विरंगुळा
इतरांचा छळ
सगळे भरले जखमांनी
आणि त्याला काही लागत नाही
तरीही त्याचे भागत नाही

- समर्पण

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.