पैसा पैसा पैसा - मराठी कविता

पैसा पैसा पैसा, मराठी कविता - [Paisa Paisa Paisa, Marathi Kavita] पैशाची रांगोळी, पैशाचा दिवा, पैशाची भूक आणि पैशाचा तवा.
पैसा पैसा पैसा - मराठी कविता | Paisa Paisa Paisa - Marathi Kavita

पैशाची रांगोळी, पैशाचा दिवा, पैशाची भूक आणि पैशाचा तवा

पैशाची रांगोळी, पैशाचा दिवा
पैशाची भूक आणि पैशाचा तवा

पैशाची ओटी, पैशाचे औक्षण
पैशाची दुःख आनि पैशाचे दडपण

पैशाचा आशिर्वाद, पैशाची किम्मत
पैशाचा मोठेपणा, पैशाची हिम्मत

पैशाचे मत आणि पैशाचा विश्वास
पैशाचा राम आणि पैशाचा वनवास

पैशाचे राज्य, पैशाची प्रजा
पैशाचा आनंद, पैशाची मजा

पैशाची घरं, पैशाची नाती
पैशाचे तेल आणि पैशाचा वाती

पैशाचा सागर, पैशाचा लाटा
पैशाचे संबंध, पैशाचा वाटा

पैशाचे प्रेम, पैशाची भाषा
पैशाचे स्वप्न आणि पैशाची आशा

पैशाची कला, पैशाचे बळ
पैशाची व्यथा आणि पैशाची कळ

पैशाची मदत, पैशाची भीक
पैसा नसे तर घात पैसा असे तर ठीक

पैशाची आई, पैशाचे बाबा
पैशाची हुकुमत, पैशाचा ताबा

पैशाचे जगणे, पैशाचे मरणे
आयुष्य म्हणजे फक्त पैसा पैसा करणे

- समर्पण

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.