रसगुल्ले
रसगुल्ले
रसगुल्ले करण्यासाठी लागणारा जिन्नस
- १ लिटर गाईचे दूध
- १ मोठा चमचा सफेद विनेगर
- सव्वा किलो साखर
- २ छोटे चमचे मैदा
- काही थेंब गुलाब पाणी
रसगुल्ले करण्याची पाककृती
- गायीच्या दुधास उकळवावे.
- गॅस बंद करुन दुधात सफेद विनेगर टाकुन दुध फाडावे.
- फाटलेले दुध एका कपड्यात ठेवावे आणि त्यात थंड पाणी टाकावे.
- कपडा दाबून अतिरिक्त पाणी काढुन टाकावे.
- आता तयार झाले पनीर.
- तयार झालेल्या पनीरला चांगल्या तर्हेने मिळवावे.
- मैदा मिळवून छोटी छोटी गोळ्या बनवाव्या आणि वेगळ्या ठेवाव्यात.
- तीन चतुर्थांश लिटर पाण्यात साखर मिळवावी.
- उकळवून कच्चा पातळ पाक बनवावा.
- तयार गोळ्या हळुच त्यात टाकुन १ मिनीट पर्यंत उकळवावे.
- दोन मोठे चमचे पाणी टाकावे.
- रसगुल्ले तरंगेपर्यंत शिजवावे.
- रसगुल्ले काढुन गुलाब जल मिळवून थंड करावे, नंतर वाढावे.
रसगुल्ले
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली पाककला