दुकान - मराठी कविता

दुकान, मराठी कविता - [Dukan, Marathi Kavita] एक दुकान होते, त्याचे नाव होते घर, खुप काही होते दुकानात विकायला.
दुकान - मराठी कविता | Dukan - Marathi Kavita

एक दुकान होते, त्याचे नाव होते घर, खुप काही होते दुकानात विकायला

एक दुकान होते
त्याचे नाव होते घर
खुप काही होते दुकानात विकायला
पलंग, चादरी, उशा डोकं टेकायला
गॅस, फ्रिज, चांदीची भांडीम मिक्सर
ओवन आणि ग्राईन्डरने तर भरून काढली कसर
हॉलचा झुंबर, सोफा, बार टेबल, टी.वी
ए.सी., सी.डी., पेन्टींग आणि खेळणी नवी नवी
विक्रेता घरातले हसत गवे करत
आमच्या दुकानात जे मिळते ते कुठेच नाही मिळत
सर्व काही बेस्ट आहे मोजाव्या लागतील नोटा
राजेशाहीचे दुकान आहे नको विचार छोटा
दुकानाच्या कोपऱ्यात पडले होते काही नावडते सामान
अवस्था होती वाईट पण लागत नव्हते अवमान
सहज विचारले मी काय आहे हा पसारा
दिसतोय जसा धुळ पडलेला मोराचा पिसारा
म्हणाले आहे विश्वास, आदर, लळा, जीव, प्रेम
चांगले विचार, मैत्री, आपलेपणा, मनाचे थोडे थेंब
हृदयाचे ठोके, माया, दया, धीर, स्पर्श
स्वप्नांची दुनिया आनि नवे उत्कर्ष
पसाऱ्यावर ठेवला होता एक बोर्ड
आणि त्यावर लिहिले होते ‘बोल्ड’
ऑल दिज थिंग्स आर अ‍ॅलरेडी ‘सोल्ड’

- समर्पण

1 टिप्पणी

  1. अतिशय सुंदर!.
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.