न घेता आलेले निरोप - मराठी कविता

न घेता आलेले निरोप, मराठी कविता - [Na Gheta Aalele Nirop, Marathi Kavita] न घेता आलेले निरोप, रिकामेच परतून आलेले निरोपाचे क्षण.
न घेता आलेले निरोप - मराठी कविता | Na Gheta Aalele Nirop - Marathi Kavita

न घेता आलेले निरोप, रिकामेच परतून आलेले निरोपाचे क्षण

न घेता आलेले निरोप
रिकामेच परतून आलेले निरोपाचे क्षण
कातडीत रुतून बसतात
जन्मभरासाठी
पुढच्या अनेक जन्मांसाठी

कातडीत रुतून बसलेल्या क्षणांच्या
स्वप्नात येत राहतात
निरोप न घेता निघून जाणारे जीव

कातडीतून आत आत झिरपत
वियोगाच्या हृदयात विलाप करणाऱ्या
प्रेमाचा हात घट्ट धरत
जाणाऱ्यांना हाका मारत राहतात
निरोप न घेता आलेले क्षण

- दीप्तीदेवेंद्र

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.