झटपट उडीद मेथी - पाककृती

झटपट उडीद मेथी, पाककला - [Jhatpat Udid Methi, Recipe].
झटपट उडीद मेथी - पाककृती | Jhatpat Udid Methi - Recipe

झटपट उडीद मेथी


झटपट उडीद मेथीझटपट उडीद मेथी करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • ५०० ग्रॅम मोठे बटाटे
 • २ वाट्या ओले खोबरे
 • ४ मोठे चमचे तेल
 • २ चमचे उडदाची डाळ
 • अर्धा चमचा मोहरी
 • पाव चमचा मेथी
 • पाव चमचा हिंग
 • पाव चमचा हळद
 • चवीनुसार मीठ
 • दीड चमचा तिखट (आवडीनुसार)
 • लिंबाएवढी चिंच
 • सजावटीसाठी कोथिंबीर

झटपट उडीद मेथी करण्याची पाककृती


 • चिंच तासभर भिजत टाकून नंतर कोळ काढावा.
 • बटाट्याची साले काढून लांब चिप्ससारखे तुकडे चिरून पाण्यात ठेवावे.
 • नारळ बारीक घ्यावा.
 • मोठ्या पातेल्यात तेल तापले की त्यात उडदाची डाळ बदामीसर परतावी व मोहरी घालावी.
 • मोहरी तडतडली की खाली उतरून मेथी व हिंग घालावा.
 • लगेच बटाट्याचे तुकडे, हळद, तिखट, मीठ व तीन वाट्या गरम पाणी घालून पुन्हा चुलीवर ठेवावे.
 • बटाटे शिजले की चिंचेचा कोळ घालावा व २-३ मिनिटे मंद उकळू द्यावे.
 • नंतर वाटलेला नारळ घालावा.
 • ढवळून पाच मिनिटे शिजवावे.
 • वाढताना असल्यास थोडी कोथिंबीर घालावी व वाढावे.
 • भाताबरोबर किंवा पोळी - भाकरीबरोबर छान लागते.

झटपट उडीद मेथी

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.