Loading ...
/* Dont copy */

सोपा दहीवडा - पाककृती

सोपा दहीवडा, पाककला - [Easy Dahi Vada, Recipe].

सोपा दहीवडा - पाककृती | Easy Dahi Vada - Recipe

सोपा दहीवडा


सोपा दहीवडा



सोपा दहीवडा करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • १ वाटी उडदाची डाळ
  • १ वाटी मोडाचे मूग
  • ४ - ५ हिरव्या मिरच्या
  • ४ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
  • १ इंच आले
  • १ चमचा मीठ
  • ४ - ५ चमचे तेल
  • अर्धा चमचा मोहरी
  • अर्धा चमचा जीरे
  • पाव चमचा हिंग
  • अर्धा चमचा लाल तिखट
  • १ चमचा जिरेपूड
  • अर्धा चमचा साखर
  • २ वाट्या गोड ताक
  • पाव चमचा बेकिंग सोडा

सोपा दहीवडा करण्याची पाककृती


  • डाळ दोन तास भिजवावी.
  • मोड आलेले मूग, डाळ, मिरच्या व कोथिंबीर धुवून निथळावी.
  • आले बारीक चिरावे.
  • सर्व एकत्र भरडसर वाटावे.
  • पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये वाटताना जास्ती पाणी घालू नये.
  • मिश्रणात मीठ व सोडा घालून हाताने फेसावे.
  • त्याचे छोटे चपटे वडे हाताने वळावे.
  • कुकरमध्ये मोदक वाफवतो तसे चाळणीवर फडके किंवा केळीचे पान ठेवून त्यावर तेलाचा हात फिरवावा व हे वडे वाफवून शिजवावेत.
  • ताकात एक वाटी पाणी घालावे.
  • वडे शिजल्यानंतर बाहेर काढावे.
  • थंड झाले की ताकात थोडा वेळ ठेवावेत.
  • एकीकडे दही घुसळावे.
  • त्यात मीठ व साखर घालावी.
  • तेल तापवून मोहरी, जिरे व हिंगाची फोडणी या दह्यावर ओतावी.
  • ताकातले वडे दुसर्‍या भांड्यात काढावेत. त्यावर हे दही घालावे.
  • सजावटीसाठी थोडी कोथिंबीर, लाल तिखट व जिरेपूड भुरभुरावी.

सोपा दहीवडा

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची