क्रीम ऑफ क्रीम ऑफ मशरूम सूप - पाककृती

क्रीम ऑफ मशरूम सूप, पाककला - [Cream of Mushroom Soup, Recipe].
क्रीम ऑफ मशरूम सूप - पाककृती | Cream of Mushroom Soup - Recipe

क्रीम ऑफ क्रीम ऑफ मशरूम सूप


क्रीम ऑफ क्रीम ऑफ मशरूम सूपक्रीम ऑफ मशरूम सूप करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • २०० ग्रॅम मशरूम
 • १०० ग्रॅम बीट
 • २ कांदे
 • २ मोठे चमचे लोणी
 • १ लहान चमचा मैदा
 • १ कप दूध
 • २ मोठे चमचे ताजे क्रिम
 • १ लहान चमचा मीठ
 • १/२ लहान चमचा काळी मिरी पावडर
 • १ लिंबू

क्रीम ऑफ मशरूम सूप करण्याची पाककृती


 • मशरूम व बीटचे लहान लहान चिरून तुकडे करा.
 • कांदा मिक्सरमधून काढून घ्या.
 • कुकरमध्ये मशरूम व बीट ६ कप पाण्याबरोबर उकडून घ्या.
 • गार झाल्यावर गाळून घ्या.
 • एका भांड्यात लोणी गरम करा व कांदा भाजून घ्या.
 • कांदा लालसर झाल्यावर त्याच्यात मैदा टाकून १ मिनीट भाजा.
 • आता दूध टाकून हलवत रहा.
 • मशरूम व बीटचे पाणी, मीठ, काळी मिरी पावडर टाका.
 • १० मिनीटे हलवत रहा.
 • वरुन ताजे क्रिम घाला. लिंबू पिळा.
 • तयार आहे क्रीम ऑफ मशरुम सूप.
 • गरम सूप पिण्यास द्यावे.

क्रीम ऑफ क्रीम ऑफ मशरूम सूप

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.