Loading ...
/* Dont copy */

आठवणींचा कचरा - मराठी कविता

आठवणींचा कचरा, मराठी कविता - [Aathavanincha Kachara, Marathi Kavita] अशीच एकदा शांत फिरत होते, आठवणींचा रडगा साफ करत होते.

आठवणींचा कचरा - मराठी कविता | Aathavanincha Kachara - Marathi Kavita

अशीच एकदा शांत फिरत होते, आठवणींचा रडगा साफ करत होते

अशीच एकदा शांत फिरत होते
आठवणींचा रडगा साफ करत होते

रगड्यात सापडली एक जुनी छत्री
डोळ्यातला पाऊस म्हणाला ‘ए भित्री’
छत्रीचा तुटका दांडा बसवत होते
‘आता मी भित्री’ म्हणुन स्वतःलाच फसवत होते

कोपऱ्यात पडलेले एक शेफर्सचे पेन
त्याच्या टोपणात अडकलेली चांदीची चेन
त्या दोघांचा गुंता मी सहजपणे सोडला
किती वर्ष उलघडली याचा हिशोब मी जोडला

तेवढ्यात दिसले एक कवितेचे पुस्तक
धडधडले छातीत आणि आट्यांनी भरले मस्तक
वाचल्यावर ओठांवर अलगद हसु आले
किती सुंदर होते ते दिवस जे गेले

खणाच्या शेवटी एक कागद अडकलेला
त्या कागदाने एकेकाळी ज्वाला भडकलेला
आता तो कागद मी फाडून फेकला
कचऱ्याच्या टोपलीत अलगद टेकला

एवढी धूळ साठलेली काय मी म्हणु
आठवणींच्या प्राजक्तांचा सडा होता जणु
एका ओल्या फडक्याने तो सडा पुसुन टाकला
भावनांच्या धुळीत मात्र हात माझा माखला

रिकामा खण म्हणजे रुपक आयुष्याचे
कसा खण भरु, आता विचार भविष्याचे
नको त्या वस्तू, त्रास नको आता
नको त्या मनाला यातना येता जाता

खणात भरलं मी डोळ्यातलं पाणी
काही बोलक्या कविता आणि काही जुनी नाणी
नाण्यांच्या बाजूला विचार थोडे मांडले
त्यांच्यासह हृदयाचे ठोके थोडे सांडले

तरीही थोडीशी उरली होती जागा
भरला जरी आठवणींचा लांब लचक तागा
राहिलेल्या जागेत स्वप्न म्हटलं भरु
पुर्ण नाही झाली तर नंतर पुर्ण करु

जुने पुराणे खूप काही जपले एवढे दिवस
स्वप्न, टिका, प्रेम, दुःख आठवणी अणि नवस
केवढं काम केले म्हणे जीव माझा हसरा
लाख मोलाचा असे माझा आठवणींचा कचरा..

- समर्पण

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची