तू असतीस आयुष्यात - मराठी कविता

तू असतीस आयुष्यात - मराठी कविता - [Tu Asatis Ayushyat,Marathi Kavita] तू असतीस आयुष्यात,तर बात कुछ ओर असती, स्वप्नांच्या बागेत फक्त,तुझीच सुगंधी फुले.
तू असतीस आयुष्यात - मराठी कविता | Tu Asatis Ayushyat - Marathi Kavita

...स्वप्नांच्या बागेत फक्त, तुझीच सुगंधी फुले असती

तू असतीस आयुष्यात
तर बात कुछ ओर असती
स्वप्नांच्या बागेत फक्त
तुझीच सुगंधी फुले असती

गुलाबाचा सुगंध तू होऊन
आयुष्यात सतत दरवळत असती
लाजाळूच्या पानासारखी स्पर्श होताच
स्वतःलाच कवटाळली असती

आली असतीस आयुष्यात
सदाफुली सारखी सदा
फुलत - हसत तू राहणारी
वेड्यासारखं प्रेम करून हि
मैत्रीचं नाव तू देणारी

झालो असतो तुझा मी
आपले हि छान आयुष्य रंगले असते
मनातल्या शब्दांना तुझ्या
ओठांवरती जर तू आणले असते

आयुष्य माझं चंदना सारखं
सुगंधित झालं असतं
जर तुझ्या त्या कोड्यात
म्हटलेल्या शब्दांना
मी तेव्हाच समजून घेतलं असतं
मी तेव्हाच समजून घेतलं असतं


सचिन पोटे | Sachin Pote
मुंबई, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी माध्यमातून शिक्षण झालेले, अस्सल मुंबईकर सचिन पोटे हे ‘द युथ सोशल फोरम’ या स्वयंसेवी संस्थेसोबत जोडलेले आहेत आणि मराठी भाषेवर नितांत प्रेमापोटी विविध विषयांवर लेखन करतात.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.