मला ती नेहमीच आवडायची - मराठी कविता

मला ती नेहमीच आवडायची, मराठी कविता - [Mala Tee Nehamich Avadayachi, Marathi Kavita].
मला ती नेहमीच आवडायची - मराठी कविता | Mala Tee Nehamich Avadayachi - Marathi Kavita

..अन्‌ ति नेहमी वेळे नंतरच भेटायची

तिची नेहमीच मी वाट पहायची
अन्‌ ति नेहमी
वेळे नंतरच भेटायची
आणि कारण तर तिची
नेहमीच तयार असायची

भर पावसात यावं लागलं
म्हणून मुरका मारून बसायची
ओलेचिंब होऊन जवळ यायची
अन्‌ तिला पाहताच जवळ येताना
मी हि तिच्यात सामावून जायचो

ती नेहमी वेग वेगळ्या
रूपातच दिसायची
दिवाळी-दसऱ्याला
छान सजायची
प्रत्येकाच्या सोबती असायची

कित्तेक वेळेस रागाची बळी पडायची
पण ती मुळीच नाही बोलायची
दोष तिचा नसूनही
साऱ्यांचा रोष ती
आपल्यावरच ओढून घेयाची

कधी मनुष्याच्या स्वार्थासाठी
केले तिने सहन
तर कधी दगडांची शिकार व्हायची
आले संकट कितीही
तरी नाही थांबायची

ऊन असो कि असो पावसाळा
मला ती रोज भेटायची

ती 🚃सकाळची ०८:१३ ची ट्रेन
मला नेहमीच आवडायची


सचिन पोटे | Sachin Pote
मुंबई, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी माध्यमातून शिक्षण झालेले, अस्सल मुंबईकर सचिन पोटे हे ‘द युथ सोशल फोरम’ या स्वयंसेवी संस्थेसोबत जोडलेले आहेत आणि मराठी भाषेवर नितांत प्रेमापोटी विविध विषयांवर लेखन करतात.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.