Loading ...
/* Dont copy */

दे आर सेम सेम बट डिफरंट

दे आर सेम सेम बट डिफरंट - [They are same but different] जुळी नशीबवान असतात की आजीवन त्यांना एक हक्काचा साथीदार, भागीदार असतो.

दे आर सेम सेम बट डिफरंट | They are same but different

जुळी नशीबवान असतात की आजीवन त्यांना एक हक्काचा साथीदार, भागीदार असतो आणि...


नेहमी प्रमाणेच आज दुपारी मी झोपायचा प्रयत्न करत होते आणि तिकडे दोघींच्या दंग्याला ऊत आला होता. एक राक्षस होऊन जोरजोरात हीऽऽ हा हा हा हाऽऽऽ अशी ओरडत होती नि दुसरी राजकन्या होऊन कुठे तरी लपून बसली होती. कित्ती मज्जा आहे ना त्यांच्या जगात! हे असं आपल्याला हवं तसं खेळणारे, आपल्याला सांभाळून घेणारे, भांडायलाही कमी न करणारे... आपल्याला आपल्या परीने समजून घेणारे कुणीतरी आपल्या सोबत कायम असावे; ही मला वाटतं आपल्या प्रत्येकाची गरज असते!



जुळी नशीबवान असतात की आजीवन त्यांना एक हक्काचा साथीदार, भागीदार असतो आणि मला वाटतं सुजाण पालकांनी, जुळ्यांना वाढवताना शक्यतो हा फायदा, तोट्यात बदलणार नाही ह्याची आपल्यापरीने दक्षता जरूर घ्यावी. म्हणजे कसं?... कधी कधी दोघांत एक थोडा अशक्त असण्याची शक्यता असते अशावेळी आपण मस्करीत सुद्धा त्याचा उच्चार न करता दोघांना आपापल्या कुवतीनुसार घडू द्यावं. म्हणजे इथे फक्त समान वागणुक एवढाच उद्देश नाहीये. आपल्यात ताकद, उंची, रूप किंवा जी काही उणीव आहे, तिचा एक तर ते मूल न्यूनगंड बाळगू लागेल किंवा त्या गोष्टीवर आपला फायदा करून घ्यायचं शिकेल; जे दुसऱ्याच्या प्रगतीसाठी सुद्धा हानिकारक आहे. आपल्याकडे हे फार केलं जातं, म्हणजे एक मूल थोडं सावळं असेल तर लगेच त्याला काळ्या, कधी घाऱ्या, जाड्या असं संबोधलं जातं आणि मुलं मोठी होताना स्वतःच्या अस्तित्वाशी ते कायमस्वरूपी जोडून घेतात.

आता एखाद्या केसमध्ये जुळ्यांचं मुळातच आपापसात जमत नसेल तर (वृत्ती भांडखोर असेल) एक म्हणजे त्यांना बालपणी कायम गुंतवून ठेवणं कठीण जाऊ शकतं (हे योग्य थेरपीने नक्की बदलता येऊ शकतं). तसंच जर का त्यांचं खूप चांगलं जमत असेल तरी दोघेही पुढे जोडीने असे उद्योग करून ठेवतात, जे निस्तरणं महाकठीण होऊन जातं. ज्यांच खूप चांगलं जमतं, ते एकमेकांवर अवलंबून राहण्याचीही शक्यता असते. उदा. माझी एक मुलगी मला सांगायची. “आई मला जिन्याच्या इथे भीती वाटत होती. तेव्हा मी तिचा हात धरला आणि ती मला वरपर्यंत घेऊन गेली.” आता ह्यात प्रथमदर्शनी दोघींच निश्चितच कौतुक आहे. पण ह्याची दोघींना सवय लागू नये, पहिलीने तिच्या भीतीवर स्वतः मात करणं आवश्यक आहे.

असंच अजून एक challenge म्हणजे ह्यांना भरवताना वगैरे बऱ्यापैकी एका ताटातच घेतलं जातं किंवा आंघोळी, कपडे, हे ही एकत्र केले जातात. ही मुलं जेव्हा स्वावलंबी होऊ लागतात, तेव्हा माझं ताट, त्यातला माझा - माझा खाऊ, माझे कपडे, एवढंच नव्हे तर अगदी माझं शरीरही माझं - माझं वेगळं आहे आणि ते कुणाशीही share करायचं नाही, हे ही निक्षून शिकवावं लागतं. त्या त्या टप्प्यावर त्यांना त्यांच्या वय आणि बुद्धीनुसार हे सगळं समजावून सांगणं हे ही एक आव्हान आहे. माझ्या एका मैत्रिणीला जुळे मुलगा - मुलगी आहेत. मुलं आता साडे पाच वर्षांची आहेत. त्यातल्या मुलीला अजून कळतच नाही की तिची आई तिला तिच्या भावापेक्षा वेगळे कपडे का घालते? तिची आई बिचारी छान छान फ्रॉक्स घेऊन येते, ज्यांच्याकडे ती मुलगी बघत सुद्धा नाही. केसही वाढवू देत नाही. तिला तिच्या भावासारखं राहायचं असतं. त्यांच्याबाबतीत याला एक वैयक्तिक कारणही आहे ते म्हणजे साधारण एक वर्षाच्या आसपास असताना या दोघांमधल्या मुलीला ‘भरवायला आणि झोपवायला आजी चालते’ म्हणून त्यांची आई दुपारी आणि रात्री या मुलीला आपल्या आईजवळ द्यायची आणि मुलाला स्वतःजवळ झोपवायची. पुढे मोठी होता होता मुलीच्या मनात ते राहिलं असल्याची आणि त्यावरून आपल्यालाही भावासारखी आईची जवळीक अधिक मिळावी यासाठीची होणारी तिची नाकळती धडपड वास्तव आहे. अशावेळी खरं तर दोन्ही मुलांना दोघींची सवय लागेल, याकडे लक्ष दिलं पाहिजे होतं.

जशी, वयानुसार घरी आणि शाळेतसुद्धा मुलगा - मुलगी वेगळे असतात, हे शिक्षण दिलं जातंच की तरीही जन्मापासून आपण ज्याला आपल्या सोबत बघतो, त्याला आपल्यापेक्षा वेगळी वागणूक दिली जातेय, हे एकदा त्या कोवळ्या मेंदूत बसलं, की बसलं. त्यामुळे हे सगळं खूप जपून सांभाळावं लागतं.

Identity issues ज्याला म्हणतात, त्याची सुरुवात जुळ्यांसाठी खूपच बालपणी सुरू होते. बाळ साधारणपणे बसू लागलं, संवाद साधू लागलं की आपण त्याला त्याचं नाव विचारतो नं, “बाळ कुठे आहे?” आणि मग त्याचा हात त्याच्या छातीवर ठेवून आपण म्हणतो, “बाळ इथे आहे.” जुळी मुलं जास्तीतजास्त वेळेला “बाळ कुठे आहे?” विचारलं की दुसऱ्या बाळाकडे बोट दाखवतात...! तसंच, स्वतःचं नाव आणि दुसऱ्याचं नाव वेगळं आहे, हे ही लक्षात यायला त्यांना वेळ लागतो. माझ्या मुली तर अगदी दीड वर्षांपर्यंत गोंधळायच्या... म्हणजे नावाने हाक मारली तरी दोघी बघायच्या किंवा जिला हाक मारली ती दुसरीने उत्तर द्यायची वाट बघायची. या उलट साधारण तीन वर्षांच्या असताना त्यांना कळू लागलेलं, की आई - बाबांशिवाय कुणाला कळत नाहीये आपण कोण आहोत, त्यामुळे त्या अधून-मधून मुद्दाम उलटी नावं सांगून लोकांची मजा सुद्धा बघायच्या!

आपला एक साथी नेहमी आपल्या सोबत आहे, खेळताना, जेवताना, झोपताना हा एक मोठा आधार असतो ह्या मुलांना. बालपण सरता सरता ह्या आधाराची सवय होते आणि कधी दुसरा सोबत नसेल तर असुरक्षित वाटू लागतं. आपली identity एकमेकांशी जोडली जाणं, हा त्यांच्या अस्तित्वाचा खूप मोठा भाग असतो खरंतर. काही identical म्हणजे समान दिसणारी जुळी मुलं, मोठी होता होता, साधारणपणे वय वर्षे दहा नंतर वेगळी दिसू लागतात. एवढी वर्षे ज्यांना एकत्रितपणे ओळखलं जायचं, त्यांना अचानक समाजामध्ये वेगळी ओळख मिळणं, हे त्यांच्या teenage काळात तणावात्मक ठरू शकतं. तसंच काही मुलांना ही वैयक्तिक ओळख जास्त महत्त्वाची वाटू शकते, कारण जुळ्या मुलांना नेहमीच तुलनेला सामोरं जावं लागतं. त्यामुळे एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून घडण्यासाठी या ही काळात आई - वडिलांच्या सक्षम पाठबळाची गरज पडते. यात अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आईचं आणि बाबांचं दोन्ही मुलांशी स्वतंत्र नातं असणं गरजेचं आहे. इथे त्यांना एकत्रित धरून चालणार नाही. एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून या दोघांनाही घडायला, वाढायला, (चुका करत) शिकायला आणि व्यक्त व्हायला (हे घर/ कुटुंब) ही हक्काची जागा आहे, हा विश्वास अबाधित राहिला पाहिजे आणि यासाठी आई आणि बाबा (जर काही कारणाने एकत्र राहत नसले तरी) यांचे एकत्रित तरीही वैयक्तिक प्रयत्न असले पाहिजेत. अमेरिकेमध्ये हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे.

आपल्या दोन्ही मुलांना जोडीने सगळं करताना बघण्यात अमाप गोडी आहेच. पण ह्यांना दोन वैयक्तिक व्यक्तिमत्त्व म्हणून वाढवण्यासाठी, घडवण्यासाठी, आपल्याही बुद्धी-शक्तीचा कस लागतो. दुर्मिळ आव्हान वाटतं मला तर हे! आपल्या ओटीत आलीयेत, तर जमेल तेवढ्या संयमाने त्यांची जोपासना करायची, हे माझं व्रत. प्रत्येक गोष्टीत अती लक्ष देऊनही चालत नाही. त्यांची भांडणं, बोचकारणं, पडणं-लागणं, एकट्या मुलासारखंच (risk level थोडी जास्त असली तरी) त्यांनी आपल्या आपण सावरायला शिकायची वाटही पाहावी लागते. पुढे कधीतरी लिहीनच ह्याविषयी.

आत्ता इथे थांबूया.


प्रज्ञा वझे-घारपुरे | Pradnya Vaze-Gharpure
बंगळूर, कर्नाटक (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
बिझीनेस मॅनेजमेंट विषयात पदविधर असलेल्या प्रज्ञा यांना लहान मुंलांविषयीच्या लेखनात रस आहे त्यावर त्यांची काही पुस्तके देखील प्रकाशित झालेली आहेत.

अभिप्राय

अभिप्राय
नाव

अ ल खाडे,2,अ ज्ञा पुराणिक,1,अंकित भास्कर,1,अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनंत फंदी,1,अनंत भावे,1,अनिकेत येमेकर,2,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनिल भारती,1,अनुभव कथन,15,अनुरथ गोरे,1,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,3,अभिव्यक्ती,1201,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित पापळ,31,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमृत जोशी,1,अमृता शेठ,1,अमोल देशमुख,1,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद थगनारे,3,अरुण कोलटकर,1,अर्जुन फड,3,अर्थनीति,3,अल्केश जाधव,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,959,आईच्या कविता,22,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,6,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,18,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,11,आदित्य कदम,1,आनं कविता,1,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,24,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,17,आर समीर,1,आरती गांगण,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,20,आशिष खरात-पाटील,1,इंदिरा संत,6,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,7,इसापनीती कथा,48,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,12,उमेश चौधरी,1,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,ऋषीकेश कालोकार,2,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एम व्ही नामजोशी,1,एहतेशाम देशमुख,2,ऐतिहासिक स्थळे,1,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,15,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,ओमकार खापे,1,औरंगाबाद,1,कपिल घोलप,11,करमणूक,67,कर्क मुलांची नावे,1,कल्याण इनामदार,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,96,कवी अनिल,1,कवी ग्रेस,2,कवी बी,1,काजल पवार,1,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,काशिराम खरडे,1,कि का चौधरी,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,किशोर पवार,1,कुठेतरी-काहीतरी,3,कुणाल खाडे,2,कुणाल लोंढे,1,कुसुमाग्रज,10,कृष्णकेशव,1,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,के नारखेडे,2,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशव मेश्राम,1,केशवकुमार,3,केशवसुत,5,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,1,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगुळकर,4,ग दि माडगूळकर,1,ग ल ठोकळ,3,ग ह पाटील,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश तरतरे,16,गणेश निदानकर,1,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गावाकडच्या कविता,13,गुरुदत्त पोतदार,2,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोकुळ कुंभार,11,गोड पदार्थ,56,गोविंद,1,गोविंदाग्रज,1,गौतम जगताप,1,ग्रेस,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,जयश्री मोहिते,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,427,जुलै,31,जून,30,ज्योती किरतकुडवे,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,2,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तरुणाईच्या कविता,7,तिच्या कविता,56,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दत्तात्रय भोसले,1,दया पवार,1,दर्शन जोशी,2,दर्शन शेळके,1,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिवाळी फराळ,26,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,73,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धनराज बाविस्कर,58,धनश्री घाणेकर,1,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,11,नमिता प्रशांत,1,ना धों महानोर,3,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नारायण सुर्वे,2,नाशिक,1,नासीर संदे,1,निखिल पवार,3,निमित्त,3,निराकाराच्या कविता,9,निवडक,4,निसर्ग कविता,25,नोव्हेंबर,30,न्याहारी,49,पथ्यकर पदार्थ,2,परभणी,1,पराग काळुखे,1,पर्यटन स्थळे,1,पल्लवी माने,1,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,319,पाककृती व्हिडिओ,15,पालकत्व,7,पावसाच्या कविता,31,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,12,पुरुषोत्तम पाटील,1,पुर्वा देसाई,1,पूजा चव्हाण,1,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,26,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रदिप कासुर्डे,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,14,प्रवीण दवणे,1,प्रवीण राणे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,13,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिती चव्हाण,16,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,93,प्रेरणादायी कविता,16,फ मुं शिंदे,3,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,9,बहीणाबाई चौधरी,3,बा भ बोरकर,2,बा सी मर्ढेकर,4,बातम्या,9,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,3,बायकोच्या कविता,5,बालकविता,14,बालकवी,3,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,21,बिपीनचंद्र नेवे,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,भंडारा,1,भक्ती कविता,16,भक्ती रावनंग,1,भरत माळी,2,भा रा तांबे,2,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भानुदास धोत्रे,1,भूगोल,1,भूमी जोशी,1,मं वि राजाध्यक्ष,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंगेश कळसे,9,मंगेश पाडगांवकर,5,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,2,मंदिरे,4,मधल्या वेळेचे पदार्थ,40,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी,1,मराठी उखाणे,2,मराठी कथा,102,मराठी कविता,840,मराठी कवी,2,मराठी गझल,25,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,40,मराठी चित्रपट,15,मराठी टिव्ही,48,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,5,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,42,मराठी मालिका,18,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,44,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,105,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,158,मसाले,12,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,308,महाराष्ट्र फोटो,9,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेंद्र म्हस्के,1,महेश बिऱ्हाडे,6,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,3,माझा बालमित्र,90,मातीतले कोहिनूर,17,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मीना तालीम,1,मुंबई,10,मुंबई उपनगर,1,मुकुंद भालेराव,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,6,मोहिनी उत्तर्डे,2,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,2,यशवंत दंडगव्हाळ,22,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,5,योगेश सोनवणे,2,रंगपंचमी,1,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रविंद्र गाडबैल,1,रागिनी पवार,1,राजकीय कविता,8,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश पोफारे,1,राजेश्वर टोणे,3,रामकृष्ण जोशी,1,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रुपेश सावंत,1,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लहुजी साळवे,1,लक्ष्मण अहिरे,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वर्धा,1,वसंत बापट,1,वा भा पाठक,1,वात्रटिका,2,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि सावरकर,1,विंदा करंदीकर,2,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,56,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,3,विशेष,6,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव गव्हाळे,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,व्यंगचित्रे,48,व्रत-वैकल्ये,1,व्हिडिओ,11,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,6,शांता शेळके,3,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,13,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिरीष महाशब्दे,9,शिक्षकांवर कविता,4,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,11,शेती,1,शेषाद्री नाईक,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीधर रानडे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीरंग गोरे,1,संघर्षाच्या कविता,31,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत चोखामेळा,1,संत तुकडोजी महाराज,1,संत तुकाराम,8,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,4,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदेश ढगे,39,संध्या भगत,1,संपादक मंडळ,1,संपादकीय,10,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,132,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,22,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सदाशिव गायकवाड,2,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,9,सरबते शीतपेये,8,सरोजिनी बाबर,1,सलीम रंगरेज,8,सविता कुंजिर,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,साने गुरुजी,5,सामाजिक कविता,113,सामान्य ज्ञान,8,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,3,सुदेश इंगळे,19,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरज दळवी,1,सुरज पवार,1,सुरेश भट,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,6,सैनिकांच्या कविता,4,सैरसपाटा,127,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,5,स्वाती खंदारे,317,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती पाटील,1,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,40,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,1,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमंत जोगळेकर,1,हेमंत देसाई,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: दे आर सेम सेम बट डिफरंट
दे आर सेम सेम बट डिफरंट
दे आर सेम सेम बट डिफरंट - [They are same but different] जुळी नशीबवान असतात की आजीवन त्यांना एक हक्काचा साथीदार, भागीदार असतो.
https://1.bp.blogspot.com/-ne6sE6BM_KE/YRagAVbD8SI/AAAAAAAAGjA/_o1AjYtpGDEggbIxMK6uxGq5ycmFcaa7gCLcBGAsYHQ/s0/they-are-same-but-different.jpg
https://1.bp.blogspot.com/-ne6sE6BM_KE/YRagAVbD8SI/AAAAAAAAGjA/_o1AjYtpGDEggbIxMK6uxGq5ycmFcaa7gCLcBGAsYHQ/s72-c/they-are-same-but-different.jpg
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2021/08/they-are-same-but-different.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2021/08/they-are-same-but-different.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची