वेळोवेळी आपली भांडती माणसे, एकेकाळी पाहीली जाणती माणसे
वेळोवेळी आपली भांडती माणसे
एकेकाळी पाहीली जाणती माणसे
ढासळली होती भिंत थोडी खचलेली
आड्यावरची लाकडं जाळती माणसे
उंबऱ्यातून आत येई कोवळे ऊन
सावल्यांना घाबरून पाहती माणसे
वादळी तडाखे सोसावे तरी किती
चिरेबंदी वाड्यात राहती माणसे
हास्याचे फवारे दुःखाचे ओघळ
लपवूनी खुजेपणा चालती माणसे
मन गाभाऱ्यात जपलेली पिंपळपाने
कशाकरता तोडूनी टाकती माणसे
शोधती पुन्हा मार्ग परमार्थ जाणुन
देवत्वाचा हक्क आज सांगती माणसे
- प्रविण पावडे