तू कधी - मराठी कविता

तू कधी, मराठी कविता - [Tu Kadhi, Marathi Kavita] तू कधी ना कळी मागितली, ना मी तुझी हौस पुरविली.
तू कधी - मराठी कविता | Tu Kadhi - Marathi Kavita

तू कधी ना कळी मागितली, ना मी तुझी हौस पुरविली

तू कधी ना कळी मागितली
ना मी तुझी हौस पुरविली

उगा करी शिरजोरी अशी
फुकाचे ते मौन कर्ज जशी
छळते तुलाही कातरवेळी
जालीम ती चुरचूरी इंगळी
हसून तूही साथ सोडली
ना मी तुझी इच्छा जाणली

कशी ताठरपणाची गुर्मी
घाव बसलाय माझ्या वर्मी
बांडगुळागत रेंगते तुझ्यावरी
लाळघोटी जिव्हा साखरेपरी
फिरुन तुजपाशी गोंडा घोळी
ना मी तिला कधी रोखली

कधी पेरली साखर थोडी
लावली होती शब्दांची गोडी
मंद प्रकाशात जाणवली
बोचरी नजर अशी टोचली
अजाण पाल चुकचुकली
गोळा करून लुळीपांगळी
तुझी अवहेलना ऐकली

- प्रविण पावडे

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.