माझ्या वाट्याचा श्वास संपला, सुन्न झाला देह थिजले आभाळ
असं कसं अचानक सगळंना ध्यानी ना मनी
माझ्या वाट्याचा श्वास संपला
सुन्न झाला देह थिजले आभाळ
नात्यागोत्याच्या दाट वस्तीतुन
जात होती सुनी सुनी शवयात्रा
दुख नाही त्याचे, निजताना सरणावर
त्यांच्या आठवणी पुरेश्या आहे
असा कसा बरसला होता काळ
उरावर माझ्या पाचवा जळत होता
मी कुणात तरी मिसळत होतो
राखेच्या रंगात विरघडत होतो
खांदेकरी माझे खाकीतले फक्त दोन
दवाखान्यातला कंपौंडर पण छान
उतरावा हो खांदे त्यांचे तूप लावून
त्यांचाही काढा कडू घास
बंदिस्त किट मधील औषधाचा वास
अजूनही नाकात घुमत आहे
सारं संपल्यानंतर ही जीव गुदमरत आहे
लवकर या हो, लवकर संपवा माझा हिशेब
थैलीत स्मशानाच्या एका खुंटीवर
वटवाघुळा सारखा लटकवल्या गेलो
शाईने लिहलेलं थैलीवरच नाव
पुरती ओळख आता शिल्लक आहे