मी एक खडा - मराठी कविता

मी एक खडा, मराठी कविता - [Me Ek Khada, Marathi Kavita] पाखडल्या जात होतो, नाचत होतो, बांगड्यांच्या तालावर.
धान्य पाखडण्याचे वेताचे सुप

पाखडल्या जात होतो, नाचत होतो, बांगड्यांच्या तालावर

पाखडल्या जात होतो
नाचत होतो
बांगड्यांच्या तालावर

सुपातील दाण्यांच्या
कोणत्याही प्रतवारीत
मी बसत नव्हतो

मी खडा, मी काळा
पाखडणाऱ्याच्या लवकर
नजरेत भरलो

मग काय
उचलून बाहेर
फेकला गेलो

आता जे सुपात आहे
ते दळली जाणार आहेत

मी बाहेर आहे, मस्त आहे
सुखात आहे, तुपात आहे


गणेश तरतरे | Ganesh Tartare
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता आणि अनुभव कथन या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.