आतल्या आणि बाहेरच्यांची, मर्यादा निक्षून सांगू लागलो, घरांची वाड्याची, वस्तीची गावाची, शहराची येस बनलो
आतल्या आणि बाहेरच्यांचीमर्यादा निक्षून सांगू लागलो
घरांची वाड्याची
वस्तीची गावाची
शहराची येस बनलो
मग मला सवय लागली
भिंत बनून उभं रहायची
कुठेही उभं राहू लागलो
विचारा विचारात
रंगा रंगात
धर्मा धर्मात
गरीब श्रीमंतात
नात्या गोत्यात
डाव्या उजव्यात
वरच्या खालच्यात
पहिल्या मागल्यात
मोठ्या लहानात
आत आणि बाहेर पाहता
हाडामासाची सारखीच होती
त्यात, भिंत बनून उभा राहिलो
कधी उभा राहिलो? माहित नाही
का उभा राहिलो? माहित नाही
कुणी उभं केलं? माहित नाही
पाय मोडे पर्यंत उभा राहावं लागेल
दिलेली भूमिका पूर्ण करावी लागेल
इमाने इतबारे निभवावी लागेल
हे पात्र माझे, हा खेळ का मायेचा?
तुझी मर्जी मोहरा मी तुझा
बंदूक तुझी खांदा का माझा?
माझी इडा पीडा टळो
माझे पाय लवकर झडो
आतले बाहेरचे असे कुणी न राहो
हाडामासातील माणूसपणासाठी