बहाव्याकडून शिकण्यासारखं - मराठी कविता

बहाव्याकडून शिकण्यासारखं, मराठी कविता - [Bahavyakadun Shikanyasarakh, Marathi Kavita] माणसाला बहाव्या कडुन, किती आहे शिकण्यासारखं.
बहाव्याकडून शिकण्यासारखं - मराठी कविता | Bahavyakadun Shikanyasarakh - Marathi Kavita

माणसाला बहाव्या कडुन, किती आहे शिकण्यासारखं, उन्हाच्या झळा स्वतः सोसत...

माणसाला बहाव्याकडुन
किती आहे शिकण्यासारखं
उन्हाच्या झळा स्वतः सोसत...
इतरांसाठी बहरत राहायचं!!

डबक्यात उमलून सुध्दा
कमळ मलीन होत नाही
जन्म कुठेही झाला तरी...
आपलं पावित्र्य सोडत नाही...!

नारळाचं प्रत्येक झाड...
जणू माणसा साठीच जगत असतं...
नारळ, पाणी, झावळ्या असं...
मुक्तहस्ते देत असतं!

वड, पिंपळ, कडुलिंब...
गर्द सावली देत राहतात...
अंगाखांद्यावरती आपल्या
पक्षांची कुटुंब खेळवत बसतात!

चरख्यामधे पिळून सुध्दा
ऊस गोडी सोडत नाही...
वरुन दिसला काटेरी... तरी
फणसाची माधुरी संपत नाही!

फळं, मुळं, फांद्या, पाने...
झाडं कायम देतच असतात...
आयुष्यभर इतरांकरता
आपलं आयुष्य लुटत जातात...!

निसर्गातील प्रत्येक गोष्ट
काहीतरी शिकवून जाते...
दुसर्‍या करता कसं जगावं
हे सहज सांगून जाते!


स्वाती नामजोशी | Swati Namjoshi
पुणे, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कथा या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.