Loading ...

गुढीपाडवा - सण-उत्सव (स्वाती खंदारे)

मराठीमाती डॉट कॉमच्या सह-संपादिका आणि छायाचित्रकार स्वाती खंदारे यांचा गुढीपाडवा हा सण-उत्सव विभागातील मराठी लेख.

गुढीपाडवा - सण-उत्सव (स्वाती खंदारे)

चैत्र या मराठी महिन्यांतला पहिला दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच मराठी नववर्षारंभ दिवस असणारा गुढीपाडवा...

गुढीपाडवा .

स्वाती खंदारे (सह-संपादिका आणि छायाचित्रकार, मराठीमाती डॉट कॉम)

प्रस्तावना
मुलांनो! मराठी महिने कोणते असं विचारलं की तुम्ही लगेच सुरवात करतात... चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ... खरं ना? ते ही अगदी बरोबरच.

चैत्र महिना हा मराठी महिन्यांतला पहिला महिना. त्या महिन्यातला पहिला दिवस म्हणजे ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ नव संवत्सराचा म्हणजे नव वर्षाचा पहिला दिवस. ह्या दिवशी दारोदारी गुढी उभारून ह्या नवीन सुरू होणाऱ्या वर्षाचे स्वागत केले जाते. ह्या दिवशी गुढी उभारायची ही आपल्या भारतीय संस्कृतीतली जुनी परंपरा आहे. परंपरा जुनी म्हणजे किती तर असं सांगतात की त्या ब्रह्मदेवानं जेव्हा ही सकल सृष्टी निर्माण केली. त्या वस्तू मात्रांचा कार्यारंभाचा हा दिवस म्हणून गुढी लावायची. प्रभू रामचंद्र हे चौदा वर्षांचा वनवास संपवून अयोध्येला परत आले तो हा दिवस. त्या दिवशी सकल अयोध्या वासीयांनी गुढ्या तोरणं उभारून श्रीरामांच स्वागत केलं तो हा दिवस. ह्या चैत्र महिन्यांत जर आपण सभोवतालच्या सृष्टीचं अवलोकन केलं तर असं लक्षात येत की, शुष्क झालेली सृष्टी, पानांची मोठ्या प्रमाणावर झालेली पानगळ, निष्पर्ण झालेले वृक्ष हे आता चैत्राच्या नव पालवीनं फुललेले असतात. वसंत ऋतूची चाहूल ही कोकीळ कंठातून फुटणाऱ्या सु-स्वराने लागलेली असते. निसर्गातल्या परिवर्तनाचा, नव चैतन्याचं, नव सृष्टीचं स्वागत दारी गुढी लावून करायचं हा पण त्या मागचा एक उद्देश आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठावे. मंगलस्नान करावे आणि सुर्वोदयाच्या वेळ म्हणजेच ब्राह्म मुहुर्तावर ही गुढी उभारायची असते. आता गुढी कशी तयार करायची? तर एक उंच काठी घ्यायची. त्या काठीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र. कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांची माळ, साखरेची गाठी ह्या वस्तू बांधायच्या. त्यावर तांब्या-पितळ्याच्या नाहीतर कास्याचा गडू लावायचा. ही तयार केलेले गुढी दारात लावायची. गुढी लावायची ती जागा स्वच्छ करून धुवून-पुसून त्यावर रांगोळी काढावी. गुढीची काठी तिथे नीट बांधावी. काठीला गंध, फुलं, अक्षता लावाव्यात. गुढीची पूजा करावी. निरांजन लावावे. उदबत्ती दाखवावी. दुध साखरेचा, पेढ्याचा वगैरे नैवेद्य दाखवावा. दुपारी गुढीला गोडा-धोडाचा नैवेद्य दाखवतात. संध्याकाळी सूर्यास्ताचे वेळी पुन्हां हळद-कुंकू, फुले वाहून व अक्षता टाकून ही गुढी उतरवण्याची आपल्याकडे प्रथा आहे. गुढी पाडव्याचे दिवशी वर्षारंभ होतो म्हणून त्या दिवशी पंचांग पूजन करून त्यातील नव संवत्सर फल वाचले जाते. चैत्र प्रतिपदा ह दिवस साडेतीन मुहुर्तातला एक म्हणून ह्या दिवसाला महत्त्व आहे. ह्या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ ई. गोष्टी केल्या जातात. सुवर्ण खरेदी हा त्यातलाच एक भाग. ...आणि बरं का मुलांनो! त्या दिवशी आई, आजी-आजोबा हे तुम्हाला कडुलिंबाची पानं खायला लावतात. त्या मागचं शास्त्रीय कारण असं की ह्या कडुलिंबाच्या सेवनाने आपली पचनक्रिया सुधारते. वर करणी कडु असणारी ही वनस्पती आरोग्यदायक, आरोग्यवर्धक आणि आरोग्यदायी आहे. पचनक्रिया सुधारणे, पित्त नाश करणे, त्वचा रोग बरे करणे, धान्यांतली कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधीगुण ह्या कडुलिंबाच्या अंगी आहेत. दारी उभारलेली गुढी हे मांगल्याचं, पवित्र्याचं, समृद्धीचं प्रतिक आहे. ह्या दिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नव वर्षाचे अभिष्टचिंतन ही केले जाते. ह्या गुढी पाडव्यापासूनच श्रीराम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो.

अक्षरमंच - मुक्त विचारपीठमराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त विचारपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची