
शोधात तुझ्या अनुरागी - (मराठी कविता) सुदेश इंगळे यांच्या ‘निम्म्या रेषांचा अपरिग्रह’ या काव्य संग्रहातून.
मी वेताळ कधीचा लटकत दशकांनाही फुटला पाझर शोधात तुझ्या अनुरागी ओळींवर मी रचले अत्तर या ओळीही हलक्या फुलक्या यांच्यावर ना कसली झालर कशा तरंगत याव्या तिथवर अन् घालावा माझा जागर