Loading ...
/* Dont copy */

तृष्णा भाग १ (Action reaction) - मराठी कथा

तृष्णा भाग १,मराठी कथा - [Trushna Part 1,Marathi Katha]कधी न भेटणारे दोन विरुद्ध टोकाचे दोन जीव भेटले! मग सुरू झाला प्रवास एका संघर्षाचा आणि तृष्णेचा.

तृष्णा भाग १ - मराठी कथा | Trushna Part 1 - Marathi Katha

कधीही न भेटणारे दोन विरुद्ध टोकाचे दोन जीव भेटले! मग सुरू झाला प्रवास एका संघर्षाचा आणि तृष्णेचा!

Every Action has a reaction!
तो श्रीमंत बापाचा एकुलता एक वारस
ती कष्टकरी वडीलांची सुविद्य मुलगी
तो स्वतःचा हट्ट पुरा करणारा
ती दिलेला शब्द खरी करणारी
तो बेशिस्त, बेछूट, बेपर्वा
ती शिस्तबद्ध, जबाबदार, कणखर...
“And they happily live ever after...!” वैदेहीने परीकथांच्या पुस्तकातली सिंड्रेलाची गोष्ट संपवली आणि पेंगुळलेल्या अबोलीच्या गालांची हळुच पापी घेऊन तीने पांघरुण सारखे केले. अबोली, तिची गोड पोरगी आठ वर्षांची झाली तरी अजून झोपताना आईकडून गोष्टी ऐकल्याशिवाय झोपत नव्हती. प्रेमळ हसत वैदेही बेडरुममधे डोकावली. अनिरुद्ध अजूनही लॅपटॉपवर काम करत बसला होता. एका मल्टीनॅशनल कंपनीत अतिशय चांगल्या पोस्टवर असलेल्या अनिरुद्धला उत्तम पगार होता पण त्या बरोबर आलेला ताण आणि work pressure होतंचं. त्याला डीस्टर्ब न करता वैदेही सासुबाईंच्या बेडरुममधे डोकावली. आई, जप पूर्ण करुन आता झोपायच्या तयारीतच होत्या. गरम पाण्याचा फ्लास्क त्यांच्या उशाशी ठेऊन वैदेही आपल्या बेडरुमकडे परत फीरली. येवढ्यात बाहेर काचा फुटल्याचा जोरदार आवाज, नंतर पोरांच्या अर्वाच्य शिव्या आणि नंतर कोणाच्या तरी घाणेरड्या जोकवर मोठमोठ्याने हसण्याचा आवाज आला आणि वैदेहीच्या डोक्यात तिडीक गेली. हे आता रोजचंच व्हायला लागलं होतं. वैदेही लग्न होउन कॉलनीत राहायला आली तेव्हा तिला खरोखर कॉलनी आवडायची. तिथली शांतता, झाडांचा गारवा, बाग, ग्राउंड आणि वातावरण... सगळचं. पण गेल्या काही वर्षांत सगळचं चित्र बदललं होतं. जसं गावाचं, शहरीकरण व्हायला लागलं, कॉलेजेस आली, मॉल आले, हॉटेल्स वाढली, बाहेरुन येणाऱ्या आणि एकटं राहणाऱ्या तरुण मुलांची संख्या वाढली. हॉस्टेलमधे राहणाऱ्या मुलांना बंधन नसे.

त्यात कोणी बडे बाप का बेटा असला की मग विचारायलाच नको! जेवढी गुंडगिरी जास्त तेवढा या तथाकथित भाई मंडळीना मान जास्त. मग त्यांच्या जिवावर दारुपार्टी, बिर्याणी पार्टी, लेट नाईट बड्डे सेलिब्रेशन आणि वेगवेगळे डे साजरे व्हायचे. बियरच्या बाटल्यांची रेलचेल असायची, पोरं झिंगली की हाणामारी, मस्ती, धिंगाणा एकमेकांना शिव्या... हे चित्र आता दररोजचे झाले होते. दोन तीन वेळा जवळच्या पोलीस चौकीत तक्रार केली होती. पोलिसांनी सुध्दा गस्त घालताना, एका दोघांना हटकले होते. पण तेवढेच! याचा पुरता बंदोबस्त लागत नव्हता.

रात्रीचे अकरा वाजायला आले होते. मुलांचा दंगा सुरुच होता. वैतागून वैदेहीने पुन्हा एकदा पोलीस स्टेशनला फोन लावला. दहाव्या मिनीटांत पोलीसांनी जीप ग्राउंड जवळ आली. वैदेहीला आज या कटकटीचा कायमचा बंदोबस्त करायचा होता. ती पण पटकन खाली उतरली.

दोन मोठ्या महागड्या गाड्यांमधली म्युझिक सिस्टीम लाऊन पोरं धतिंग करत होती. पोलीसांची गाडी जवळ आली तशी त्यातली काही पोरं चपापून गप्प बसली बाकी अजून उधळलेलीच होती.

ए‌ऽऽऽ!!! चल, काय रे! काय गोंधळ चाललाय इकडे?! घरदार नाय का रे?! तुझ्या... xxxxx!! हवालदार आणि सब इन्स्पेक्टर साहेबांनी त्यांचा ठेवणीतला आवाज काढून, समोर दिसलेल्या दोन चार पोरांचं बखोट धरलं!

“एऽऽऽ, हीरो!! चल लायसन काढ! कुठल्या कॉलेजची रे तुम्ही?!

त्यातल्या एकाकडे लायसन्स नव्हतचं!

“एऽऽऽ, उद्या चौकीत यायचं! चल निघ... नाहीतर बापाला फोन लाव तुझ्या, बोलतो मी!

टोयोटा फॉर्च्यूनरमधे बसलेलं पोरगं बहुतेक त्यांचा म्होरक्या आणि बडे बापका बेटा असावा, कारण त्याचं लायसन्स बघितल्यावर हवालदाराने तोंडातून एकही शब्द काढला नाही!

“इन्स्पेक्टर साहेब! हि रोजची कटकट आहे आम्हाला; प्लीज यांचा बंदोबस्त करा, नाहीतर मला लेखी कंप्लेंट करायला लागेल! वैदेही वैतागून म्हणाली.

“ताई, सोडून द्या! तरुण वय आहे. त्यांच्या नादाला नका लागु तुम्ही, आम्ही बघतो त्यांना... असं बोलून इंस्पेक्टरने वैदेहीची समजूत घालून तीला परत पाठवली खरी, पण याचा काय उपयोग होईल की नाही याची मनात तिला शंकाच होती.

स्वताःशिच पुटपुटत वैदेही बेडरुममधे गेली तेव्हा अनिरुद्ध स्मितहास्य करत आपल्या angry young बायकोकडे कौतुकाने पहात म्हणाला “पुन्हा भांडलीस?! तु दुर्लक्ष का नाही करत त्या पोरांकडे?! अगं, लहान आहेत. या वयात मस्ती करतातच पोरं! सोडून दे.”

“अनिरुद्ध!? तुम्हाला कधीच कशाचं काही वाटत नाही. पण मी तुमच्या सारखी संत महंत नाही आणि दुसऱ्याला त्रास देणारी मस्ती मला अजिबात मान्य नाही!!”

“ओके, आता गेली ना मुलं?! मग शांत हो पाहु. तीला जवळ घेत थोपटत अनिरुद्ध म्हणाला आणि त्याने दिवा मालवला.

दुसरा दिवस नेहमी सारखाच सुरू झाला. सकाळचा चहा, ऑफीसची तयारी, अबोलीच्या शाळेकरता आवरा आवरी, घरातली साफसफाई... अनिरुद्ध आणि वैदेहीची ऑफीसेस दोन वेगवेगळ्या दिशांना होती म्हणून दोघांच्या दोन वेगळ्या गाड्या होत्या. वैदेहीची गाडी रस्त्यावर पार्क असे. वैदेही खाली उतरली आणि समोरचं दृष्य बघुन थिजलीच!

दोन्ही गाड्यांचे सगळे टायर पंक्चर होऊन बसलेले होते आणि दोन्ही गाड्यांवर ऑईल पेंटचे भरलेले कॅन ओतले होते!!

“Oh! My God?!” अनिरुद्ध, प्लीज पटकन खाली या. हे सर्व काय आहे, मला समजत नाहीए...

एवढ्यात रस्त्यावर समोरच्या बाजूला उभ्या असलेल्या गाड्यांमधून तीला जोरजोरात हसण्याचा आवाज आला.

“साला... xxxxx!! आपल्यावर पोलीस घातले! आता जा ना चौकीत. मग बघतो!! कोणीतरी पोरगं बोललं आणि दुसर्‍याने त्याला टाळी दिली.

वैदेहीच्या डोक्यात आता मात्र सणक गेली!

तिरीमिरीत चालत ती समोरच्या गाडी जवळ गेली. खसकन ड्रायव्हरच्या साईडचं दार उघडलं. ती असं काही करेल याची कल्पना नसल्याने बेसावध ड्रायव्हिंग साईट्सवर बसलेल्या पोराला काही कळायच्या आतच, काचेतुन हात घालून चावी खेचून घेतली... आणि तो तिला काही बोलणार ईतक्यात, त्याच्या सणसणीत कानफटात वाजवली...! हे सगळं एवढं क्षणात घडलं की काही क्षण मुलांना कळलचं नाही की नक्की काय झालं. कानावर हात ठेऊन जळजळीत डोळ्यांनी तिच्याकडे पहाणाऱ्या पोराच्या नजरेला आपली तिखट नजर देत ती कडाडली...! “चल, फुट! निघ इकडनं! कवडीची औकात नाही स्वतःची.” जाऽऽऽ! ज्या बापाच्या जिवावर तु माज करतोयस ना, त्याला बोलावून घे चावी मागवायला! नाहीतर जा चौकीत तक्रार करायला. चल फुट! आणि मागे एकदाही न बघता अबोलीचा हात धरुन ती रिक्शा स्टॅंडवर गेली सुध्दा.

आज तिनं पहिला दणका दिला होता! आणि आज ना उद्या त्याचे पडसाद उमटणार होते. प्रत्युत्तर मिळणारच होतं. फक्त ते कसं ते मात्र आज कोणालाच माहीत नव्हतं!

क्रमशः
स्वाती नामजोशी | Swati Namjoshi
पुणे, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कथा या विभागात लेखन.

अभिप्राय

अभिप्राय
नाव

अ ल खाडे,2,अ ज्ञा पुराणिक,1,अंकित भास्कर,1,अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनंत फंदी,1,अनिकेत येमेकर,2,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,15,अनुरथ गोरे,1,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,3,अभिव्यक्ती,1199,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित पापळ,31,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमृत जोशी,1,अमृता शेठ,1,अमोल देशमुख,1,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद थगनारे,3,अरुण कोलटकर,1,अर्जुन फड,3,अर्थनीति,3,अल्केश जाधव,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,957,आईच्या कविता,22,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,6,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,18,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,11,आदित्य कदम,1,आनं कविता,1,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,24,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,17,आर समीर,1,आरती गांगण,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,20,आशिष खरात-पाटील,1,इंदिरा संत,6,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,7,इसापनीती कथा,48,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,12,उमेश चौधरी,1,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,ऋषीकेश कालोकार,2,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एम व्ही नामजोशी,1,एहतेशाम देशमुख,2,ऐतिहासिक स्थळे,1,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,15,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,ओमकार खापे,1,औरंगाबाद,1,कपिल घोलप,11,करमणूक,66,कर्क मुलांची नावे,1,कल्याण इनामदार,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,70,कवी अनिल,1,कवी बी,1,काजल पवार,1,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,काशिराम खरडे,1,कि का चौधरी,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,किशोर पवार,1,कुठेतरी-काहीतरी,3,कुणाल खाडे,2,कुणाल लोंढे,1,कुसुमाग्रज,10,कृष्णकेशव,1,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशव मेश्राम,1,केशवकुमार,3,केशवसुत,5,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,1,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगुळकर,4,ग दि माडगूळकर,1,ग ल ठोकळ,3,ग ह पाटील,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश तरतरे,16,गणेश निदानकर,1,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गावाकडच्या कविता,13,गुरुदत्त पोतदार,2,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोकुळ कुंभार,11,गोड पदार्थ,56,गौतम जगताप,1,ग्रेस,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,जयश्री मोहिते,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,427,जुलै,31,जून,30,ज्योती किरतकुडवे,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,2,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तरुणाईच्या कविता,7,तिच्या कविता,56,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दत्तात्रय भोसले,1,दर्शन जोशी,2,दर्शन शेळके,1,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिवाळी फराळ,26,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,73,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धनराज बाविस्कर,58,धनश्री घाणेकर,1,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,11,नमिता प्रशांत,1,ना धों महानोर,1,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नाशिक,1,नासीर संदे,1,निखिल पवार,3,निमित्त,3,निराकाराच्या कविता,9,निवडक,4,निसर्ग कविता,25,नोव्हेंबर,30,न्याहारी,49,पथ्यकर पदार्थ,2,परभणी,1,पराग काळुखे,1,पर्यटन स्थळे,1,पल्लवी माने,1,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,319,पाककृती व्हिडिओ,15,पालकत्व,7,पावसाच्या कविता,31,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,12,पुरुषोत्तम पाटील,1,पुर्वा देसाई,1,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,26,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रदिप कासुर्डे,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,14,प्रवीण दवणे,1,प्रवीण राणे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,13,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिती चव्हाण,16,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,93,प्रेरणादायी कविता,16,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,9,बहीणाबाई चौधरी,3,बा भ बोरकर,2,बा सी मर्ढेकर,4,बातम्या,9,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,3,बायकोच्या कविता,5,बालकविता,14,बालकवी,3,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,21,बिपीनचंद्र नेवे,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,भंडारा,1,भक्ती कविता,16,भक्ती रावनंग,1,भरत माळी,2,भा रा तांबे,2,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भानुदास धोत्रे,1,भूगोल,1,भूमी जोशी,1,मं वि राजाध्यक्ष,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंगेश कळसे,9,मंगेश पाडगांवकर,2,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,2,मंदिरे,4,मधल्या वेळेचे पदार्थ,40,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी,1,मराठी उखाणे,2,मराठी कथा,102,मराठी कविता,812,मराठी कवी,2,मराठी गझल,25,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,40,मराठी चित्रपट,15,मराठी टिव्ही,47,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,5,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,42,मराठी मालिका,18,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,44,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,79,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,158,मसाले,12,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,308,महाराष्ट्र फोटो,9,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेंद्र म्हस्के,1,महेश बिऱ्हाडे,6,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,3,माझा बालमित्र,90,मातीतले कोहिनूर,17,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मीना तालीम,1,मुंबई,10,मुंबई उपनगर,1,मुकुंद भालेराव,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,6,मोहिनी उत्तर्डे,2,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,2,यशवंत दंडगव्हाळ,22,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,5,योगेश सोनवणे,2,रंगपंचमी,1,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रविंद्र गाडबैल,1,रागिनी पवार,1,राजकीय कविता,8,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश पोफारे,1,राजेश्वर टोणे,3,रामकृष्ण जोशी,1,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लहुजी साळवे,1,लक्ष्मण अहिरे,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वर्धा,1,वा भा पाठक,1,वात्रटिका,2,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि सावरकर,1,विंदा करंदीकर,2,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,56,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,3,विशेष,6,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव गव्हाळे,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,व्यंगचित्रे,48,व्रत-वैकल्ये,1,व्हिडिओ,11,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,6,शांता शेळके,3,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,13,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिरीष महाशब्दे,9,शिक्षकांवर कविता,4,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,11,शेती,1,शेषाद्री नाईक,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीधर रानडे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीरंग गोरे,1,संघर्षाच्या कविता,31,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकडोजी महाराज,1,संत तुकाराम,8,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,4,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदेश ढगे,39,संध्या भगत,1,संपादक मंडळ,1,संपादकीय,10,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,132,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,22,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सदाशिव गायकवाड,2,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,9,सरबते शीतपेये,8,सरोजिनी बाबर,1,सलीम रंगरेज,8,सविता कुंजिर,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,सामाजिक कविता,113,सामान्य ज्ञान,8,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,3,सुदेश इंगळे,19,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरज दळवी,1,सुरज पवार,1,सुरेश भट,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,6,सैनिकांच्या कविता,4,सैरसपाटा,127,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,5,स्वाती खंदारे,317,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती पाटील,1,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,40,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,1,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमंत जोगळेकर,1,हेमंत देसाई,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: तृष्णा भाग १ (Action reaction) - मराठी कथा
तृष्णा भाग १ (Action reaction) - मराठी कथा
तृष्णा भाग १,मराठी कथा - [Trushna Part 1,Marathi Katha]कधी न भेटणारे दोन विरुद्ध टोकाचे दोन जीव भेटले! मग सुरू झाला प्रवास एका संघर्षाचा आणि तृष्णेचा.
https://1.bp.blogspot.com/-732UGSx86og/X_xdLZy4ACI/AAAAAAAAGC0/BJvTLLuc57wSzqp1SK42jybHM9Nd-f3DgCLcBGAsYHQ/s0/trushna-part-1-marathi-katha.jpg
https://1.bp.blogspot.com/-732UGSx86og/X_xdLZy4ACI/AAAAAAAAGC0/BJvTLLuc57wSzqp1SK42jybHM9Nd-f3DgCLcBGAsYHQ/s72-c/trushna-part-1-marathi-katha.jpg
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2021/01/trushna-part-1-marathi-katha.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2021/01/trushna-part-1-marathi-katha.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची