दुःख - मराठी कविता

दुःख,मराठी कविता - [Dukkha,Marathi Kavita] दुःखासारखी नाजूक, तरल आणि माणसाला आतून सजीव करणारी भावना प्रत्येकालाच अनुभूत होत नाही; त्यासर्वांस समर्पित.
दुःख - मराठी कविता | Dukkha - Marathi Kavita

आपल्याला सुद्धा, दुःख होतं. आभाळ सारं, डोळ्यांत दाटतं


दुःखासारखी नाजूक, तरल आणि माणसाला आतून सजीव करणारी भावना प्रत्येकालाच अनुभूत होत नाही; त्यासर्वांस समर्पित.आपल्याला सुद्धा,
दुःख होतं

आभाळ सारं,
डोळ्यांत दाटतं

कुडीत मन,
विरून जातं

सुकलं रान,
जळून जातं

असता दुःख,
खरं होतं?

नसता दुःख,
खोटं होतं!

गर्दीत दुःख,
नाईक होतं

स्वतःत दुःख,
पाईक होतं

तुझं तुला,
दुःख होतं

ओझं मला,
दुःख होतं

दुःख अस्सल,
सुखद होतं

दुःख नक्कल,
दुःखद होतं

येतं दुःख,
दुःख जातं

होतं दुःख,
त्यालाच होतं

आपल्याला सुद्धा,
दुःख होतं

आभाळ सारं,
डोळ्यांत दाटतं

हर्षद खंदारे
संस्थापक, मुख्य संपादक । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी कविता, मराठी लेख, मराठी चारोळी, फोटो गॅलरी, मराठी व्यंगचित्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

३ टिप्पण्या

  1. दुःखाची व्याख्या सुद्धा ईतकी सुंदर असु शकते?
    कमाल, कमाल लिहिलं आहेस हर्षद.
  2. Dear Harshad you have written Masterpiece poem.

    Good.
  3. दुःखाची अशी व्याख्या, असा मुड मी आज पर्यंत कोणत्याही कवितेत पाहिलेला आठवत नाही.
    वेगळं लिखाण आहे, खासच.
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.