व्हेज मंच्युरिअन, पाककृती - [Veg Manchurian, Recipe] शाकाहारींसाठी अत्यंत रूचकर चटपटीत चायनीज पाककृती.
शाकाहारींसाठी अत्यंत रूचकर चटपटीत चायनीज पाककृती
मंच्युरिअन बॉल्स बनविण्यासाठी लागणारा जिन्नस
- २ कप बारीक चिरलेला कोबी
- अर्धा कप किसलेले गाजर
- अर्धा कप बारीक चिरलेली सिमला मिरची
- २ चमचे आलं-लसूण पेस्ट
- पाव चमचा काळी मिरी पावडर
- १/२ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या (ऐच्छिक)
- थोडीशी कांदापात
- पाव कप मैदा
- पाव कप कॉर्न प्लॉअर
- चवीनुसार मीठ
- तळण्यासाठी तेल
मंच्युरिअन ग्रेव्हीसाठी लागणारा जिन्नस
- १ चमचा तेल
- १ चमचा बारीक चिरलेली लसूण
- १ चमचा बारीक चिरलेलं आलं
- १ चमचा कॉर्न प्लॉअर
- १ उभा चिरलेला कांदा
- अर्धा कप बारीक चिरलेली कांदा पात
- पाणी
- अर्धा चमचा काळी मिरी पावडर
- १ चमचा सोया सॉस
- १ चमचा रेड चिली सॉस
- १ चमचा टोमॅटो सॉस
- चवीनुसार मीठ
- पाव चमचा व्हिनेगर
मंच्युरिअन बॉल्स बनविण्याची पाककृती
- एका मोठ्या वाडग्यात बारीक चिरलेला कोबी घ्या. त्यामध्ये किसलेले गाजर, चिरलेली सिमला मिरची घाला.
- आता त्यामध्ये आलं - लसूण पेस्ट, काळी मिरी पावडर, हिरव्या मिरचीचे तुकडे आणि कांदापात घाला.
- तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्यादेखील घालू शकता.
- आता हे सर्व मिश्रण एकत्र करा.
- एकत्र केल्यावर त्यामध्ये मैदा व कॉर्न फ्लॉअर टाकून पुन्हा एकत्र करा.
- आता यामध्ये चवीनुसार मीठ घाला आणि व्यवस्थित एकत्र गोळा बनवा. पाण्याचा वापर अजिबात करू नका.
- आता या तयार गोळ्याचे लहान लहान आकारात गोळे बनवा.
- कढईत तेल गरम करायला ठेवा.
- तेल तापल्यावर त्यामध्ये हे छोटे गोळे सोडा आणि सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित तळून काढा.
- मंच्युरिअन बॉल्स तयार आहेत.
मंच्युरिअन ग्रेव्ही बनविण्याची पाककृती
- छोट्या वाटीत १ चमचा कॉर्न फ्लॉअर घेऊन त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून व्यवस्थित ढवळून घ्या. गुठळ्या राहता कामा नयेत. ही स्लरी बाजूला ठेवा.
- आता एका पॅनमध्ये १ चमचा तेल गरम करा.
- त्यामध्ये सोनेरी रंग येईपर्यंत लसूण परतून घ्या.
- आता यामध्ये कांदा परतून घ्या.
- कांदा परतल्यावर त्यामध्ये तुम्हाला आवडत असल्यास भाज्या घाला.
- कांदा पात, आलं आणि काळी मिरी पावडर घालून परतून घ्या.
- गॅस थोडा मोठा राहू द्या.
- भाज्या परतल्यावर गॅस बारीक करा व पॅनमध्ये सोया सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस व चवीनुसार मीठ टाका.
- या सॉसेस मध्ये मीठ असल्याने वरून मीठ जपून टाका.
- हे सर्व पदार्थ व्यवस्थित ढवळून घ्या.
- आता यामध्ये कॉर्न फ्लॉअरची स्लरी आणि थोडेसे पाणी घाला.
- नीट ढवळून घ्या. साधारण २ - ३ मिनीटे उकळी काढून घ्या.
- तुम्हाला जर पातळ ग्रेव्ही हवी असेल तर कॉर्न फ्लॉअर व पाण्याचे प्रमाण वाढवावे.
- उकळी आल्यावर त्यामध्ये मंच्युरिअन बॉल्स सोडावेत.
- ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित घोळवून घ्यावेत. साधारण २ - ३ मिनीटे शिजू द्यावेत.
- आता गॅस बंद करून गरमागरम व्हेज मंच्युरिअन सर्व्ह करावे.
जीवनशैली / पाककला
- [col]
- महाराष्ट्रीय पदार्थ
न्याहारीचे पदार्थ
आमट्या,सार,कढी
कोशिंबीर,सलाड,रायते
पोळी भाकरी
भाज्या - उपवासाचे पदार्थ
पौष्टिक पदार्थ
पथ्यकर पदार्थ
मसाले
चटण्या
लोणची - मधल्या वेळचे पदार्थ
सरबते व शीतपेये
पुडिंग
आईस्क्रीम
बेकिंग
गोड पदार्थ - भाताचे प्रकार
मांसाहारी पदार्थ
वाळवणाचे पदार्थ
सणासुदीचे पदार्थ
दिवाळी फराळ
पाककृतींचे व्हिडीओ
अभिप्राय