प्रेम काय असतं (मराठी कविता)

प्रेम काय असतं - (मराठी कविता) कवी सतिश चौधरी यांची कविता प्रेम काय असतं, मनापासून केल्यावर, जे सरळ हृदयात जावून बसतं, ते प्रेम असतं.
प्रेम काय असतं - मराठी कविता | Prem Kaay Asata - Marathi Kavita
प्रेम काय असतं (मराठी कविता), चित्र: हर्षद खंदारे.
प्रेम काय असतं - (मराठी कविता) कवी सतिश चौधरी यांची कविता प्रेम काय असतं, मनापासून केल्यावर, जे सरळ हृदयात जावून बसतं, ते प्रेम असतं.

प्रेम काय असतं मनापासून केल्यावर जे सरळ हृदयात जावून बसतं ते प्रेम असतं प्रेम काय असतं जे दुसर्‍याचे अश्रु पाहून स्वत:च्या अश्रुतून वाहताना दिसतं ते प्रेम असतं प्रेम काय असतं स्वतःवर कितीही संकट असली तरी जे दूसर्‍याच्या मदतीला बसतं ते प्रेम असतं प्रेम काय असतं स्वतःला भूक असुन, बाळा जेवून घे मला भुक नाही, असं म्हणत असतं ते प्रेम असतं प्रेम काय असतं स्वतःला बरं नसताना, कठोर मन ठेवून मूल उपाशीपोटी राहतील, हा विचार करत जे कामावर जात असतं ते प्रेम असतं प्रेम काय असतं खरं तर मनापासून केल्यावरच कळतं की प्रेम काय असतं, अन् ते सहच होत नसतं

- सतिश चौधरी

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.