थोडी तू तुटलीस, थोडा मीही खचलो, रात्री तु जागलीस, दिवसा मीही झोपलो
थोडी तू तुटलीसथोडा मीही खचलो
रात्री तु जागलीस
दिवसा मीही झोपलो
आताशी तु रडवेली
अश्रूंत मीही फसलो
का राग उगी दुज्यांवर
मजवरी मीही रूसलो
बेभान तू धावली
अनंत मीही चाललो
दोष कसा हा कुणाचा
नाही मीही बोललो
उघडून दार दिलाचे
हस ना तू जराशी
मिलनाचे स्वप्न तुझ्या
कवटाळतो मी उराशी