भ्रांत - मराठी कविता

भ्रांत, मराठी कविता - [Bhrant, Marathi Kavita] पाठी संसाराचे ओझे, नाही जिवा आज थारा, भोवती मृत्यूचे थैमान, भेटी कुठे हो निवारा.
भ्रांत - मराठी कविता | Bhrant - Marathi Kavita

पाठी संसाराचे ओझे, नाही जिवा आज थारा, भोवती मृत्यूचे थैमान, भेटी कुठे हो निवारा

पाठी संसाराचे ओझे
नाही जिवा आज थारा
भोवती मृत्यूचे थैमान
भेटी कुठे हो निवारा

ऊन तुडवीत वाटेने
संगे लेकरांची माय
एका धरून छातीशी
दुजाचे पोळती हो पाय

राहिले दूर घर माझे
दूर राहिला हो प्रांत
भरण्या खळगी पोटाची
जीवा असे हो प्रांत

कोरोनाने झाला आज
जीवन मरणाचा प्रश्न
पण काटा भुकेचा
आता रुते हो तीक्ष्ण

मरणाधिन झालं जिणं
मनी विचार दुसरा
चिमुकल्या माझ्या लेकरांना
कुणी द्याल हो आसरा

वाट रखरखत्या उन्हात
डोळ्यापुढे तरी अंधार
देवा तूच कैवारी
आता तुझाच हो आधार

परतेन स्वगृही तरी
तिथं विवंचना मोठी
थकलेले मायबाप
होईन त्यांची हो काठी

होवो पायाची चाळण
वा जीवाची होवो लाही
नाही थकणार आता
अन् मोडणार हो नाही


रोहित काळे | Rohit Kale
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

1 टिप्पणी

  1. Nice
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.