प्रेमपत्र - मराठी कविता

प्रेमपत्र, मराठी कविता - [Prempatra,Marathi Kavita] उत्स्फुर्त कधी,कधी आवेगाने,चोरलेली शायरी कधी योगायोगाने,भावनांची अन् शब्दांची खिचडी,असं ते पत्र.
प्रेमपत्र - मराठी कविता | Prempatra - Marathi Kavita

उत्स्फुर्त कधी, कधी आवेगाने, चोरलेली शायरी कधी योगायोगाने, भावनांची अन् शब्दांची खिचडी, असं ते पत्र

उत्स्फुर्त कधी, कधी आवेगाने
चोरलेली शायरी कधी योगायोगाने
भावनांची अन् शब्दांची खिचडी
असं ते पत्र

गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या
सैरभैर उडतात मोकळ्या
अश्रूंनी नकळत पुसलेला नेमका शब्द
असं ते पत्र

आठवणींचा सगळा गलका
आवरून कितीही नाही होत हलका
झुरलेलं मन अन् घडीवर फाटलेला जीर्ण कागद
असं ते पत्र

कधी चुरगळुन फेकायला
धजत नाही जीव तुकडे करून पुरायला
अन् तीच फाटकी घडी मुडपून ठेवावं
असं ते पत्र

आयुष्याच्या रगाड्यात प्रेम जेव्हा सरतं
अश्रूंच्या प्रवाहात तरंगून उरतं
अन् ठेवणीतलं आठवणींच वादळ
भावनांचा बांध फोडून वाहतं
असं ते पत्र

प्रेमपत्र
प्रेमपत्र
प्रेमपत्र


रोहित काळे | Rohit Kale
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.