साधी सोपी आणि झटपट होणारी डांगर - लाल भोपळ्याची भाजी
‘डांगर - लाल भोपळ्याची भाजी’साठी लागणारा जिन्नस
- २५० ग्रॅम डांगर - लाल भोपळा
- १ चमचा मोहरी
- १ चमचा मीठ
- १ चमचा तिखट
- पाव चमचा हळद
- चिमूटभर हिंग
- १ चमचा तेल
- ८ - १० कडीपत्याची पाने
- २ चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट (आवडत असल्यास)
- १ चमचा गूळ
- बारीक चिरलेली कोथिंबीर
‘डांगर - लाल भोपळ्याची भाजी’ची पाककृती
- सर्वप्रथम डांगर सोलून धुवून त्याचे लहान - लहान तुकडे करून घ्यावेत.
- आता कढईत तेल तापवून घ्या.
- तेल तापल्यावर त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की त्यात कडीपत्ता टाका.
- आता त्यामध्ये डांगराचे तुकडे टाका. छान परतवून घ्या.
- परतल्यावर त्यामध्ये हिंग, हळद, तिखट आणि मीठ टाकून व्यवस्थित परतून घ्या.
- आता परतल्यावर त्यामध्ये १ वाटी पाणी टाका व ढवळून घ्या.
- कढईवर झाकण ठेवा व झाकणावर थोडे पाणी ओता जेणेकरून भाजी मऊ शिजेल व करपणारही नाही.
- साधारण ५ मिनिटानंतर झाकण काढून भाजी ढवळून घ्या.
- आता त्यामध्ये गूळ व भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाका.
- शेंगदाण्याच्या कुटामुळे भाजीला घट्टपणा येतो.
- व्यवस्थित परतून घेऊन परत २ मिनिटांसाठी झाकण ठेवा.
- आता भाजी तयार होईल. २ मिनिटानंतर त्यात कोथिंबीर टाका. परतून घ्या.
- डांगरची भाजी तयार आहे.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली / पाककला
- [col]
- महाराष्ट्रीय पदार्थ
न्याहारीचे पदार्थ
आमट्या,सार,कढी
कोशिंबीर,सलाड,रायते
पोळी भाकरी
भाज्या - उपवासाचे पदार्थ
पौष्टिक पदार्थ
पथ्यकर पदार्थ
मसाले
चटण्या
लोणची - मधल्या वेळचे पदार्थ
सरबते व शीतपेये
पुडिंग
आईस्क्रीम
बेकिंग
गोड पदार्थ - भाताचे प्रकार
मांसाहारी पदार्थ
वाळवणाचे पदार्थ
सणासुदीचे पदार्थ
दिवाळी फराळ
पाककृतींचे व्हिडीओ