आडवी खोरी - मराठी भयकथा

आडवी खोरी, मराठी भयकथा - [Aadavi Khori, Marathi Bhaykatha] कोकणातील आडव्या खोरीचे रहस्य उलगडणारी भयकथा म्हणजे आडवी खोरी.

कोकणातील आडव्या खोरीचे रहस्य उलगडणारी भयकथा म्हणजे आडवी खोरी

कोकण, महाराष्ट्र राज्यातील एक समृद्ध प्रदेश. अगदी कोकणी ब्राम्हण ते कोकणचा आंबा इथपर्यंत कोकणाची ख्याती सर्वदूर पसरली आहे. ब्रिटिश काळात ब्रिटिश कोकण प्रदेशाला (wonders of the western ghats) असे म्हणत. असे म्हणतात की, “कोकणची माणसं लई साधी भोळी” हे जरी खरं असले तरी आजही या एकविसाव्या शतकाच्या उंबरट्यावर कोकणात काळीजादू , करणी, भूतप्रेत या गोष्टींवर कोकणातील लोकांचा गाढ विश्वास आहे. आज आपण एक अशीच रहस्यमय कथा पाहणार आहोत जी कोकणातील एका आडवी खोरी या रहस्यमय ठिकाणाचे रहस्य आहे. तसं पाहायला गेलो तर हा मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग आहे जो संगमेश्वरमध्ये ‘आडवी खोरी’ या नावाने ओळखला जातो. हा मार्ग जंगलातून जात असल्यामुळे येथील लोक त्याला ‘आडवी खोरी’ म्हणतात. असे म्हणतात की, या आडव्या खोरीवर एका चेटकीणीची सावली आहे. सायंकाळी सात नंतर गावातील लोक त्या दिशेला पाहणे देखील अशुभ समजतात. बऱ्याच वेळेला गावातील लोकांना तिथे एक अदृश्य शक्ती वावरताना आढळून आली आहे. रात्री - अपरात्री येणाऱ्या लोकांना आपल्या सोबत आणखी कोणी तरी आहे याचा भास देखील होतो.

एका रात्री श्रीपतराव व रंगराव कामावरून घरी जात होते. खूप उशीर झाल्याने त्यांना परतीचे वाहन मिळाले नाही. “आरं, आज खूप उशीर झाला रं रंग्या.” श्रीपती रंगरावांना म्हणाला. “व्हय रं, आज लई कांडाप निघाला माझा.” बोलता बोलता रंगरावाने तोंडात बिडी धरली. बिडीला काडी लावून तो श्रीपतीला म्हणाला, “काय रं, आज कारभारी लई वैतागलेलं का?” श्रीपती म्हणाला, “का रं, काय झालं?”

“आरं काय न्हाई. जरा पैशे मागितलं त्याच्याकडं तर बेनं खेकसून अंगावरच आलं माझ्या.” रंगराव बिडीचा धूर हावेत उडवत बोलत होता. “बहुतेक रात्री त्याच्या कारभारीनीबरोबर काय तर झालं असणार म्हणून असं वागला असंल.” रंगरावाच्या हातची बिडी घेत श्रीपती त्याला म्हणाला. त्या काळोखात फक्त बिडीचा विस्तव चमकत होता. अचानक बोलता बोलता श्रीपतीच्या पायात काटा घुसला व तो ‘आई गं’ असे म्हणून केकटत खाली बसला. रंगराव पुढे चालत होता. “काय रं रंग्या, आज शामल का न्हाई आली रं?” श्रीपतीने रंग्याला प्रश्न विचारला. “आरं, तिची सून हाय पोटूशी. ती कशी येईल कामावर?” रंग्याने श्रीपतीला उत्तर दिले. “पण तुला का तिचा उचका पडला रं?” रंग्याने सोबतच हा प्रश्न श्रीपतीला विचारला. “आरं, काय न्हाई. असंच ईचारलो.” श्रीपती रंगरावाला म्हणाला. “हां... असंच की काय तर येगळं हाय.” “ऐ शिरपा, तू मला सांगू नको. मी बऱ्याचदा बघितलो हाय तुमच्यात चुना सुपारीची देवाण घेवाण कशी चालती ते.” यावर श्रीपती अधाशासारखा हसू लागला. तोंडातली बिडी संपली म्हणून रंगरावाने खिशात हात घालून बिडी व काडेपेटी बाहेर काढली. तोंडात बिडी धरून हातातील काडी ओढली आणि त्या काडीच्या उजेडात समोर पाहतो ते काय जिथे श्रीपती उभा होता त्या जागेवर तो नव्हताच, तर तिथे एक काळी गोल टोपी, काळा कोट घातलेली एक आकृती उभी होती. त्या आकृतीला ना हात होते ना पाय होते. फक्त काळी टोपी आणि काळा कोट एवढेच दिसत होतं. हे पाहून रंगराव अचानक दचकलाच. ती काडी तशीच पेटत होती. रंगरावाने आपला हात फिरविला तर त्याच्या बरोबर दहा पावले मागे श्रीपती उभा होता. रंगरावासमोर उभा राहिलेल्या आकृतीला तो ही बघत होता. त्याचे हात पाय लटपटू लागले होते. अचानक वाऱ्याचा एक झोका आला व रंगरावाच्या हातातील पेटती काडी विझून गेली. विझताना रंगरावाच्या हाताला चटका बसला. पुन्हा काळोख पडला. दोघेही सुन्न होऊन उभे होते. दोघांच्याही मनात आपण कुठे आहोत याची कल्पना आली होती. ते दोघेही आडव्या खोरीत होते जिथे एका चेटकीणीचा वावर आहे. रंगराव जिवाच्या आकांताने पळत सुटला. त्याच्या मागे श्रीपती ही एक पाय लंगडत लंगडत पळू लागला. ‘आरं रंग्या, थांब थांब’ असे तो म्हणू लागला. दोघेही वस्तीवर येऊन पडले. चावडीवरील चार पाच माणसं त्यांच्या जवळ आली. “आरं रंग्या, शिरपा काय झालं तुम्हाला?” त्यातील एका वयस्कर माणसाने त्यांना विचारलं. दोघांच्याही तोंडून मरू लागलेल्या जनावरासारखा फेस गळत होता. आपण काय बघितलं ते काय होतं हे प्रश्न त्यांच्या मनात येत होते.

या गोष्टीला सुरूवात झाली होती ती सात वर्षापूर्वी. संगमेश्वर गावात नारायण केळकर व त्यांची पत्नी चित्रा हे राहायला आले होते. नारायणराव हे पेशाने पुरोहित होते. चातुर्मासातील पूजा, श्रावणातील सत्यनारायण पूजा आणि इतर पूजा सांगून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत. पण नारायणराव हे नावाने जरी नारायण असले तरी त्यांना पत्नीसुख काही चांगले मिळाले नव्हते. त्यांची पत्नी चित्रा ही दिसायला खूप सुंदर होती पण मनाने ती चंचल होती. तिला सतत चैनी विलासात राहणे, पैशांची उधळपट्टी करणे हेच आवडत असे. तिला आपल्या पतीपेक्षा परपुरूषांची खूप लालसा होती. ती बाहेर बाजारहाट करायला जायची तर आपली कंबर ठुमकत व आपली मोठी केसांची वेणी हलवत जात असे. पण गावातील काही माणसांना तिचे हे वागणे खटकत असे. चित्राने गावातील पुरूषोत्तम, जो गावाचे पाटील भिमाजी नाईक यांचा एकुलता एक मुलगा आहे. त्याच्यासोबत संग केला होता. जेव्हा नारायणराव रात्री गाढ झोपी जात तेव्हा चित्रा व पुरूषोत्तम यांचा प्रणयरूपी खेळ चालत असे. पण नारायणरावांना याची पुसटशीही कल्पना नव्हती.

एकेदिवशी नारायणराव तळकोकणात एका त्यांच्या मित्राच्या मुलग्याची मुंज सांगायला गेले होते. ही संधी साधून पुरूषोत्तम सकाळीच एखाद्या लांडग्यासारखा नारायणरावांच्या घरात शिरला. तेव्हा चित्रा किचनमध्ये पोळ्या बनवत होती. त्याने चित्राच्या कमरेत हात घातला. तशी ती शहारली. तिला आपल्याकडे खेचून घेतले व एखाद्या आधाश्यासारखा पुरूषोत्तम चित्राच्या तोंडावर चुंबनांचा वर्षाव करू लागला. नंतर त्याने तिला उचलले व पलंगावर ठेवले व दोघेही धुंद प्रणयात रमून गेले. गॅसवरील पोळी करपत होती व दुसऱ्या गॅसवरील दूध उतु जात होते तसा नारायणरावांचा संसार देखील वाया जात होता. घराशेजारून गावातील एक व्यक्ती जात होती; दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीच्या घरी सत्यनारायण पूजा घालायची होती. नारायणरावांना सांगायला ती व्यक्ती त्यांच्या घरी जात गेली. दार वाजवणार इतक्यात खिडकीतून त्या व्यक्तीला तो आतला सगळा प्रकार दिसला. ते पाहून त्या व्यक्तीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तो व्यक्ती तडक गावाचे पाटील भिमाजी नाईक यांच्या घरी जातो तेव्हा भिमाजी नाईक हे गावातील प्रश्न उत्तराच्या सभेत होते. ती व्यक्ती सभेत पोहोचते व नारायणराव यांच्या घरी जे काही पाहिलं ते सगळं काही सांगून टाकते. आपल्या आदर्श गावात हा गलिच्छ प्रकार भिमाजी नाईकांना सहन होत नाही. ते तडक ८ ते १० माणसांसोबत नारायण केळकर यांच्या घराकडे कूच करतात. दिवस मावळायला लागतो. अजूनही पुरूषोत्तम व चित्रा यांचा प्रणय सुरूच असतो. “बरं झालं अजून माझं लग्न नाही ठरलं, नाहीतर ही मलई मला कशी खाता अली असती.” चित्राच्या ओठांवर बोट फिरवीत पुरूषोत्तम बोलत होता. चित्रा त्याला हसत ‘हो का...?’ असे बोलते. तेवढ्यात भिमाजी नाईक दारावर लाथ मारून घरात घुसतात. आपल्या मुलग्याला अशा रूपात पाहून भिमाजी नाईकांना खूप राग येतो. ते लगेच पुरूषोत्तमला पलंगावरून खेचून बाजूला करतात व खाडकन् एक कानशिलात लगावतात. “अरं लेका, ह्ये काय केलंस? लाज काढलीस रं माझी.” म्हणून आणखी एक कानशिलात लगावतात. सगळ्या गाववाल्यांसमोर आपली अब्रू जात आहे हे पाहून पुरूषोत्तमला खूप लाज वाटते. तो लगेच पलटी मारतो. “आण्णा, आण्णा मला माफ करा. या छिनालीनं मला आपल्या जाळ्यात ओढलं. मला माफ करा.” व पुरूषोत्तम ते सर्व काही सांगू लागतो जे चित्रा व पुरूषोत्तम यांच्यात घडत होते, जसं की कसं चित्राने त्याला आपल्या जाळ्यात ओढले. हे ऐकून भिमाजी नाईकांची बायको गावाची पाटलीन हिला खूप राग येतो. ती खाडकन् चित्राच्या कानशिलात लगावते. “काय गं ए औदसे, तुला माझंच पोरगं दिसलं का या सगळ्यासाठी?” चित्रा ‘पुरष्या’ असे मोठ्याने किंचाळत त्याच्या अंगावर जात असते पण भिमाजी नाईक तिला अडवतात व आणखी एक कानशिलात लगावतात. ‘मारून टाका या औदसेला.’ तिथे असलेल्या दोन तीन बायका तिला चपलाने मारू लागतात. जे काही घडलं आहे यावर भिमाजी नाईकांना खूप राग येतो. रागाच्या भरात ते नारायणरावांच्या घराला आग लावायला सांगतात. चित्राला तिच्याच घरात कोंडून घातले जाते व बाहेरून ते घर पेटवून दिले जाते.

चित्रा एक चारित्र्यहिन व वाईट प्रवृत्तीची बाई असते. ती जळत असताना तिच्या तोंडून खूप सारे अपशब्द बाहेर पडतात. ती शिव्या शाप देऊ लागते. काही वेळात चित्रा तिच्या घरासोबत जळून खाक होते. नारायणराव तळकोकणातून संगमेश्वरमध्ये येतात. वाटेतच त्यांना भिमाजी नाईक व इतर लोक भेटतात व घडलेला सगळा प्रकार सांगतात. हे ऐकून त्यांना मोठी हबकी बसते व त्या हबकीमध्ये ते आपली चेतनाच हरवून बसतात. त्यानंतर थोडा कालावधी निघून जातो. चित्रा ही एक हट्टी वाईट स्त्री असते. जिवंत असताना तिच्या खूप इच्छा असतात. त्यामुळे मृत्यूनंतर तिला मोक्ष प्राप्ती होत नाही. मृत्यूनंतर तिचा आत्मा चेटकीणीच्या योनीमध्ये प्रवेश करतो व तिची काळी सावली त्या आडव्या खोरीवर पडते. तिथे रात्री अपरात्री येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तिचा अतृप्त आत्मा त्रास देऊ लागतो. याच भितीमुळे काही जणांचे हृदय बंद पडून गूढ मृत्यू होतो. काही जण आयुष्यभरासाठी वेडे होतात. चित्राच्या शिव्या शापाने भिमाजी नाईकांचे कुटुंब देशोधडीला लागते. कारण त्यांचा मुलगा पुरूषोत्तम हा चित्राच्या मोहक जाळ्यात ओढला गेला असतो. त्याच्या एका चुकीची शिक्षा संपूर्ण नाईक कुटुंबाला भोगावी लागते. जेव्हा आडव्या खोरीची ही भयानक बातमी गावचे सरपंच शशिकांत मोहिते यांना समजते तेव्हा ते कोसूंबे गावातील पंडित संध्यानंद स्वामी यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी जातात.


इंद्रजित नाझरे | Ajit Patankar
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
कादंबरी, कथा वाचनाची आवड असणारे इचलकरंजी, कोल्हापूर येथील इंद्रजित नाझरे हे मराठीमाती डॉट कॉम येथे मराठी कथा या विभागात लेखन करतात.

अभिप्राय

ब्लॉगर


  सामायिक करा


तुमच्यासाठी सुचवलेले संबंधित लेखन

नाव

अंधश्रद्धेच्या कविता,5,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,9,अनुराधा फाटक,39,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,2,अभिव्यक्ती,845,अमन मुंजेकर,6,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल देशमुख,1,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अर्थनीति,2,अलका खोले,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,617,आईच्या कविता,17,आईस्क्रीम,3,आकाश पवार,1,आकाश भुरसे,8,आज,8,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,11,आतले-बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,9,आनंद दांदळे,8,आनंदाच्या कविता,20,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,14,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,80,आरोग्य,4,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,20,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,13,उमेश कुंभार,12,ऋग्वेदा विश्वासराव,2,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,16,ऋषिकेश शिरनाथ,2,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ओंकार चिटणीस,1,कपिल घोलप,11,करमणूक,43,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,4,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,किल्ले,92,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,कुठेतरी-काहीतरी,2,कुसुमाग्रज,1,कृष्णाच्या आरत्या,5,केदार कुबडे,41,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,कोशिंबीर सलाड रायते,11,कौशल इनामदार,1,खरगपूर,1,गणपतीच्या आरत्या,5,गणेश तरतरे,10,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,7,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोड पदार्थ,37,घरचा वैद्य,2,घाट,1,चटण्या,1,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,जानेवारी,31,जिल्हे,1,जीवनशैली,262,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,डिसेंबर,31,तरुणाईच्या कविता,2,तिच्या कविता,32,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दर्शन जोशी,2,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,372,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिवाळी फराळ,9,दुःखाच्या कविता,59,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धोंडोपंत मानवतकर,9,निखिल पवार,1,निमित्त,2,निराकाराच्या कविता,6,निवडक,1,निसर्ग कविता,15,नोव्हेंबर,30,न्याहारी,37,पंचांग,6,पथ्यकर पदार्थ,2,पराग काळुखे,1,पल्लवी माने,1,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,204,पालकत्व,2,पावसाच्या कविता,18,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,9,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,11,पौष्टिक पदार्थ,14,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,10,प्रविण पावडे,5,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,5,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,71,प्रेरणादायी कविता,14,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,11,बा भ बोरकर,1,बातम्या,6,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,3,बालकविता,8,बालकवी,1,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बेकिंग,9,भक्ती कविता,8,भाज्या,21,भाताचे प्रकार,11,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,33,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी कथा,87,मराठी कविता,477,मराठी गझल,17,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,12,मराठी टिव्ही,27,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,4,मराठी प्रेम कथा,16,मराठी भयकथा,41,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,25,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,10,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,379,मसाले,12,महाराष्ट्र,270,महाराष्ट्र फोटो,9,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,18,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेश बिऱ्हाडे,1,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,1,माझा बालमित्र,53,मातीतले कोहिनूर,13,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मुंबई,8,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,यशपाल कांबळे,2,यशवंत दंडगव्हाळ,17,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,3,रजनी जोगळेकर,4,राजकीय कविता,6,राजकुमार शिंगे,1,रामचंद्राच्या आरत्या,5,राहुल अहिरे,3,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लता मंगेशकर,1,लक्ष्मण अहिरे,2,लिलेश्वर खैरनार,2,लोणची,8,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,44,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,3,विवेक जोशी,2,विशेष,4,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,1,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,व्यंगचित्रे,13,व्हिडिओ,20,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,5,शारदा सावंत,4,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,2,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,8,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीनिवास खळे,1,श्रीरंग गोरे,1,संगीता अहिरे,1,संघर्षाच्या कविता,20,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकाराम,7,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,4,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,1,संदेश ढगे,37,संपादकीय,18,संपादकीय व्यंगचित्रे,12,संस्कार,1,संस्कृती,125,सचिन पोटे,8,सचिन माळी,1,सण-उत्सव,16,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सदाशिव गायकवाड,2,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,सरबते शीतपेये,8,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सामाजिक कविता,87,सायली कुलकर्णी,3,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सिमा लिंगायत-कुलकर्णी,1,सुदेश इंगळे,3,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुरेश भट,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,2,सैरसपाटा,97,सोमकांत दडमल,1,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,3,स्वाती खंदारे,204,स्वाती दळवी,6,स्वाती नामजोशी,31,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,38,हर्षदा जोशी,3,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,harshad-khandare,1,swati-khandare,1,
ltr
item
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन: आडवी खोरी - मराठी भयकथा
आडवी खोरी - मराठी भयकथा
आडवी खोरी, मराठी भयकथा - [Aadavi Khori, Marathi Bhaykatha] कोकणातील आडव्या खोरीचे रहस्य उलगडणारी भयकथा म्हणजे आडवी खोरी.
https://1.bp.blogspot.com/-NYS3JZ9W4z0/X2wlF1hjLnI/AAAAAAAAFks/y-dXzVSN7Ro2VuaIHFItn2JJ9l8HOivoQCLcBGAsYHQ/s0/aadavi-khori-marathi-bhaykatha.jpg
https://1.bp.blogspot.com/-NYS3JZ9W4z0/X2wlF1hjLnI/AAAAAAAAFks/y-dXzVSN7Ro2VuaIHFItn2JJ9l8HOivoQCLcBGAsYHQ/s72-c/aadavi-khori-marathi-bhaykatha.jpg
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2020/09/aadavi-khori-marathi-bhaykatha.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2020/09/aadavi-khori-marathi-bhaykatha.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची