आज परिस्थिती जगात जशी, कुठेतरी भारतात नाही तशी
आज परिस्थिती जगात जशीकुठेतरी भारतात नाही तशी
आशा आकांशा घेऊन आज गाव सोडून आलोय
घरी जायचं आहे पण स्वतः जगण्यासाठी आहोत तिथे थांबलोय
परिस्थिती लॉकडाऊन असली तरी विचार मात्र मोकळेच आहेत
हे युद्ध आपण नक्की जिंकू हा विश्वास सगळेच देत आहेत
अहोरात्र झटत असलेले ते हात त्यानेच कसे आभार मानायचे कदाचित कोणी सांगावं
आपण सहकार्य करा हेही रोज त्यानीच सांगावं
रोज काहितरी बातम्या, नवीन काही गोष्टी कानावर येत आहेत
कुठेतरी चांगलं अन् कुठेतरी वाईट हेही घडताना दिसतेय
कठोर आज कितीही जरी ते वागले तरी सहन करा
आपण आज आहोत तिथे सुरक्षित रहावं यासाठीच तर ते देत आहेत पहारा
चीन, अमेरिका, इटली आदी देशातील संकट आम्ही पाहिलं
हा शत्रू इतका सर्वनाश करेल हे नाही कधी सोचलं
जनतेकडून पूर्ण सहकार्य मिळेल असं शासन वारंवार सांगतंय
आम्ही घरात राहून महाराष्ट्र शासनास पूर्ण सहकार्य करू ही प्रतिज्ञाच घेतलीय