विवरणपत्रे - व्यवसायाचे कायदेशीर अस्तित्व

विवरणपत्रे - व्यवसायाचे कायदेशीर अस्तित्व, अर्थनीति - [Vivaranpatre Vyavasayache Kaydeshir Astitva,Arthniti] वस्तु व सेवाकराचे मासिक विवरणपत्र.

विवरणपत्रे - व्यवसायाचे कायदेशीर अस्तित्व - अर्थनीति | Vivaranpatre Vyavasayache Kaydeshir Astitva - Arthniti

उद्योजकाजवळ वेळव्यवस्थापन, चिकाटी, धडाडी, मार्केटिंग किंवा संभाषण कला असे गुण असावेतच

विवरण पत्र एक आरसा:

उद्योजकाकडे सॉफ्ट कौशल्य असलेच पाहिजे. उद्योजकाजवळ वेळव्यवस्थापन, चिकाटी, धडाडी, मार्केटिंग किंवा संभाषण कला असे गुण असावेतच; पण त्याबरोबर कायदेशीर कामे वेळेवर करण्याची सवय असावी. उद्योजकाकडे पॅन पाहिजे. पॅन कार्ड आधार नंबरला लिंक केले पाहिजे. मोबाईल नंबर आधार आणि पॅनला केवळ लिंक नको तर अपडेट असला पाहिजे. बँक खात्यांना पॅन, आधार आणि मोबाईल नंबर आणि ‘ईमेल आयडी’ जोडले पाहिजे. ‘पॅन’ म्हणजे आयकर खात्याकडे तुमचा कायमस्वरूपीचा क्रमांक असतो. जसजशी वार्षिक उलाढाल होईल तसतशी आयकर खात्याकडे पॅन नंबरला माहिती अपडेट झाली पाहिजे. सर्व विभागांना एकच ‘ईमेल आयडी’ हवा आहे.

विवरण पत्राची एक डेड लाइन असते:

कर विभाग वेळापत्रकाप्रमाणे काम करते. मार्च संपल्यानंतर करदात्याने अचूक, विश्वासाहार्य, योग्य वास्तव माहिती स्वत:हून घोषित करावयाची असते. करदाता कर विभागाला देत असलेली माहिती म्हणजे ‘विवरणपत्र’. ’रिटर्न’चा डिक्शनरी अर्थ आहे ‘सरकारला हवी असेलेली माहिती, सरकारने ठरवून दिलेल्या फॉर्ममध्ये भरणे’. ‘रिटर्न फॉर्म’ हा करदाता आणि करविभाग ह्यांच्यामधील माध्यम आहे. एक वेळ टॅक्स भरणे सोपे वाटते; पण त्याचा हिशेब देणे छोट्या व्यापऱ्यांना त्रासदायक वाटते. खर्च आणि उत्पन्नाचे डिटेल्स वेळेवर तयार ठेवले तर रिटर्न अपलोड करावयाला वेळ लागत नाही. करदात्याचे व्यवहार ‘ऑडिट फर्म'शी निगडीत नसतील तर ३१ जुलै पूर्वी रिटर्न दाखल करावे लागेल.

वस्तु व सेवाकराचे मासिक विवरणपत्र जर अचूक असतील तर वार्षिक विवरणपत्र केवळ एक ‘समरी’ रिटर्न असते. जीएसटी जुलै २०१७ ते मार्च २०१८ ह्या कालावधीचे वार्षिक विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख ३० जून २०१९ आहे. वस्तु व सेवा कराच्या मासिक विवरणपत्रात राहून गेलेले व मिसमॅच असलेले इनवॉइस दाखवण्याची संधी वार्षिक विवरण पत्रात असते. वार्षिक विवरणपत्र दुरूस्त किंवा सुधारित करण्याची तरतूद वस्तु व सेवा कर कायद्यात नाही. वस्तु व सेवा कर आणि आयकर विवरण पत्रातील आकडेवारीत फरक नसावा.

योग्य फॉर्म निवडावा:

अल्बर्ट आइनस्टाईने म्हटले आहे की ‘जगात समजून घेण्याचा अवघड विषय म्हणजे आयकर’. ह्याचे कारण करदात्याने कोणत्या फॉरमॅटमध्ये माहिती भरावयाची हे सामान्य माणसाला समजत नाही. आपल्या उत्पन्नानुसार कोणता फॉर्म निवडावायचा हे एक मोठे शब्दकोडेच आहे. त्यासाठी कर विभागातील संकल्पना आणि बदल समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

१ एप्रिल २०१९ रोजी केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने ३२/२०१९ क्रमांकाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध केले. या परिपत्रकनुसार आयकर विवरण पत्रात बरेच बदल केलेत. प्राप्तीकराचा योग्य फॉर्म निवडून डिपार्टमेंटला अपेक्षित असलेल्या फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहीती भरली नाही तर करदात्याचे रिटर्न ‘इनवॅलीड म्हणजे अवैध’ ठरते. अवैध म्हणजे कायद्याने रद्दबातल झालेले, अमान्य रिटर्न म्हणजे करदात्याने रिटर्न फॉर्म भरलाच नाही म्हणून आयकर खाते कायदेशीर कारवाई करू शकते.

चांगली वित्तीय स्थिती असणाऱ्या करदात्याकडून प्राप्तीकर खात्याला आता सविस्तर माहीती पाहिजे. आता ‘सहज’ आणि ‘सुगम’ फॉर्म सर्वच करदात्यांसाठी सुटसुटीत नाहीत. पन्नास लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर ‘सहज किंवा सुगम’चा फॉर्म भरता येणार नाही.

विवरण पत्रातील निकष बदलले:

‘ऑनलाइन रिटर्न’ भरण्यातून फक्त अतिज्येष्ठ नागरिकांना सूट देण्यात येते. आयकराच्या रिफंडसाठी ऑनलाइन रिटर्न अपलोड करावे लागेल. पाच लाखापेक्षा कमी उत्पन्न करदात्यांनादेखील आता ‘ऑफलाइन रिटर्न’ दाखल करता येणार नाही. उत्पन्नाच्या स्त्रोताप्रमाणे कोणता फॉर्म वापरायचा त्यावर बंधने आणली आहेत. डोनेशनचे डिटेल्स नवीन फॉर्म मध्ये विचारलेले आहेत.

‘आयटीआर १’:

‘आयटीआर १’ हा पगारदार उत्पन्न असणाऱ्याचा ‘सहज’ फॉर्म आहे. फक्त नैसर्गिक व्यक्तीला हा फॉर्म वापरता येतो. केवळ पगाराचे उत्पन्न असेल, एकाच घराचे उत्पन्न असेल, बँक व्याज आणि लाभांशपासूनचे उत्पन्न असेल तर ‘सहज’ फॉर्म भरता येईल.

पुढील श्रेणीतील करदात्याना ‘आयटीआर एक’ भरता येणार नाही.

 • इतर मार्गापासूनचे उत्पन्न शंभर टक्के निव्वळ नसावे.
 • बँक व्याज आणि लाभांश मिळवण्यासाठी काही वेगळे खर्च करावे लागत नाही; पण मशीन भाड्याने देणे किंवा पिक्चर शूटिंगसाठी फार्महाऊस भाड्याने देणे ह्यासाठी काही खर्च येत असतो.
 • लॉटरी किंवा जुगारापासूनचे उत्पन्न मिळवायला आधी काही खर्च करावा लागतो. असे वजावट मिळणारे उत्पन्न असेल तर ‘आयटीआर १’ भरता येणार नाही.
 • करदाता जर कंपनीचा डायरेक्टर असेल तर ‘आयटीआर १’ भरू शकत नाही.
 • सार्वजनिक कंपन्यांचे शेअर्स सूचीबद्ध असतात.
 • स्टॉक एक्सचेंज वर रजिस्टर न केलेल्या काही खाजगी कंपन्या असतात.
 • करदात्याने अशा प्रायवेट कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली असेल तर ‘आयटीआर १’ द्वारे रिटर्न अपलोड करता येणार नाही.
 • करदात्याच्या पत्नीला किंवा अज्ञान बालकांना अजिबात उत्पन्न नसेल, कुटुंबातील सदस्य ‘उत्पन्न कमवते’ नाहीत पण त्यांचा काही टीडीएस कापला जात असेल तर ‘आयटीआर १’ वापरता येणार नाही.
 • पाच हजारपेक्षा जास्त कृषि उत्पन्न असेल तर करदात्याने हा प्लेन फॉर्म वापरू नये.
 • एकूण उत्पन्न पन्नास लाखापेक्षा जास्त असेल तर ‘आयटीआर १’ चा उपयोग करता येणार नाही.
 • व्यवसाय आणि कॅपिटल गेन चे उत्पन्न असेल तर ‘आयटीआर १’ भरता येत नाही.
 • अनिवासी भारतीयांना ‘आयटी आर १’ हा पर्याय नाही.
 • तुम्ही अनिवासी नाहीत पण विदेशात काही प्रॉपर्टी असेल तरी देखील तुम्हाला ‘सहज’ फॉर्म वापरता येणार नाही.
 • एखाद्या विदेशी बँक अकाऊंटमध्ये करदात्याच्या स्वाक्षरीने रक्कम काढता येत असेल तर ‘आयटीआर १’ ऐवजी ‘आयटी आर २’ अपलोड करावा लागेल.


‘आय टी आर २’

धंदा व व्यवसायाचे उत्पन्न सोडून इतर उत्पन्न असेल अशा व्यक्तीगत आणि एकत्र हिंदू कुटुंबासाठी ‘आयटीआर २’ हा फॉर्म असतो. आता हा फॉर्म जास्त कायदेशीरपणे कठोर केला आहे. करदात्याचे गेल्या वर्षात आणि मागील नऊ ते दहा वर्षातील वास्तव्य ह्या फॉर्ममध्ये विचारलेले आहे. भागीदारी संस्था, कंपनी, एलएलपी साठी ‘आय टी आर २’ फॉर्म चालणार नाही. करदात्याची विदेशात काही प्रॉपर्टी असेल त्याचे विवरण ‘आय टी आर २’ फॉर्म मध्ये विचारलेले आहे.

करदाता सार्वजनिक कंपनीचा डायरेक्टर असेल तर त्याचा ‘डिन’ आणि कंपनीचा पॅन विचारलेले आहे. करदाता छोट्या प्रायवेट कंपनीचा भागधारक असेल तर गुंतवलेल्या कॅपिटलचे सविस्तर डिटेल्स भरावे लागेल.

पगारदार करदात्यांना वेतनाबरोबरच ‘कॅपिटल गेन’ चे उत्पन्न झाले असेल तर ‘आय टी आर २’चा वापर करावा.

‘आय टी आर २’ साठी उत्पन्नाची कमाल मर्यादा नाही. सर्व करमाफ उत्पन्न ‘आयटी आर २’ मध्ये दाखवायचे असते.

‘आय टी आर ४: सुगम’

ऑडिट करदाते, एलएलपी, कंपनी, ट्रस्ट व सोसायटी सोडून इतर करदात्यांना हा फॉर्म असतो. आर्थिक वर्षं २०१८ - २०१९ पासून सुगम फॉर्म मध्ये बरेच निर्बंध आणले गेले. पन्नास लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर हा फॉर्म वापरता येणार नाही. करदाता जर कंपनीचा डायरेक्टर असेल तर सुगम फॉर्म वापरता येणार नाही. तुम्ही ज्या कंपनीत भागधारक असाल ती कंपनी जर स्टॉक एक्सचेंजला नोंदणीकृत नसेल तर सुगम फॉर्म ऐवजी ‘आय टी आर ३’ फॉर्म अपलोड करावयाचा आहे.

गृहीत उत्पन्न घोषित करणाऱ्या व्यावसायिकांसाठी ‘सुगम’ फॉर्म आहे. ताळेबंदाची ‘समरी’ येथे विचारलेली आहे. ‘मालवाहतुकीचे’ उत्पन्न दाखवणाऱ्या ट्रान्स्पोर्टरने वाहनांचे आरटीओ नंबर्स, अवजड वाहनांची क्षमता ईत्यादी तपशील टॅबुलेट करावयाचा आहे.

शेतीपासून खरोखर उत्पन्न मिळते का?

खरा पूर्णवेळ शेतकरी सततच्या नापीकीमुळे आत्महत्या करत असतो. सरकारी योजनांच्या वेगवेगळ्या सबसीडी मिळण्यासाठी ‘पर्जन्यमानाची’ सरासरी ‘पैशेवारी’ कमी दाखवली जाते. आयकर खात्याने हिशेबी वर्ष २०१८ - २०१९ पासून वैफल्यग्रस्त शेतकऱ्याची तुलना करदात्याबरोबर करण्याचा प्रयत्न केला आहे.

शेतीपासूनचे उत्पन्न पूर्णतः सर्वांना करमाफ नाही. केवळ शेतकऱ्याला ‘शेतीव्यतिरिक्त’ उत्पन्न नसेल तरच शेती उत्पन्न करमुक्त असते. कृषी उत्पन्ना बरोबर पगार किंवा व्यवसायाचे जर उत्पन्न असेल तर शेती उत्पन्नावर थोडासा मार्जिनल टॅक्स भरावा लागतो. पाच लाखापेक्षा जास्त शेती उत्पन्न असेल तर शेतीचा पूर्ण पत्ता, धारण क्षेत्र, ढोबळ आणि निव्वळ उत्पन्न, सर्व्हे नंबर ईत्यादी माहिती विचारलेली आहे.

इतर उत्पन्नाचा तपशील:

आर्थिक वर्ष २०१८ - २०१९ पासून ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवीवरील व्याजाच्या उत्पन्नातून सेक्शन ८० टीटीबी नुसार पन्नास हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. वय वर्षं ६० पेक्षा कमी असेल तर बचत खात्यावरील व्याजातून सेक्शन ८० टीटीए नुसार दहा हजार रुपयांची सूट मिळते. फॅमिली पेंशन मधून पंधरा हजार किंवा ३३.३३% दोघांपैकी जी कमी असेल ती वजावट मिळते.

वेगवेगळ्या व्याजाच्या उत्पन्नाचा सविस्तर तपशील आता विचारलेला आहे. प्राप्तीकराच्या रिफंडवर जे व्याज मिळते त्यासाठी स्वतंत्र कॉलम केले आहे. इतर उत्पन्नाचे सर्व रेकॉर्ड आयकर विभागाकडे आता एका क्लिकवर तयार आहे.

आयकर फॉर्म मध्ये जर अचूक माहीती नसेल, बँक व्याज किंवा इतर व्याजाची रक्कम रेकॉर्ड प्रमाणे ‘क्रॉस मॅच’ होणार नसेल तर तुमची केस स्क्रुटिनी लागू शकते.

- सदाशिव गायकवाड

अभिप्राय

ब्लॉगर


  सामायिक करा


तुमच्यासाठी सुचवलेले संबंधित लेखन

नाव

अंधश्रद्धेच्या कविता,5,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,11,अनुराधा फाटक,39,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,2,अभिव्यक्ती,888,अमन मुंजेकर,6,अमरश्री वाघ,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल देशमुख,1,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अर्थनीति,2,अलका खोले,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,655,आईच्या कविता,17,आईस्क्रीम,3,आकाश पवार,1,आकाश भुरसे,8,आज,10,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,11,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,9,आनंद दांदळे,8,आनंदाच्या कविता,20,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,15,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,80,आरोग्य,4,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,26,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,13,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,12,ऋग्वेदा विश्वासराव,2,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,16,ऋषिकेश शिरनाथ,2,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ओंकार चिटणीस,1,कपिल घोलप,11,करमणूक,43,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,6,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,किल्ले,92,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,कुठेतरी-काहीतरी,2,कुसुमाग्रज,1,कृष्णाच्या आरत्या,5,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,कोशिंबीर सलाड रायते,11,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,1,खरगपूर,1,गणपतीच्या आरत्या,5,गणेश तरतरे,10,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गावाकडच्या कविता,9,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोड पदार्थ,41,घरचा वैद्य,2,घाट,1,चटण्या,2,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,जयश्री मोहिते,1,जानेवारी,31,जिल्हे,1,जीवनशैली,288,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,डिसेंबर,31,तरुणाईच्या कविता,4,तिच्या कविता,33,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दर्शन जोशी,2,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,372,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिवाळी फराळ,14,दुःखाच्या कविता,61,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धार्मिक स्थळे,1,धोंडोपंत मानवतकर,9,निखिल पवार,1,निमित्त,3,निराकाराच्या कविता,6,निवडक,1,निसर्ग कविता,15,नोव्हेंबर,30,न्याहारी,40,पंचांग,6,पथ्यकर पदार्थ,2,पराग काळुखे,1,पल्लवी माने,1,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,224,पालकत्व,6,पावसाच्या कविता,18,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,9,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,12,पौष्टिक पदार्थ,14,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,10,प्रविण पावडे,9,प्रवीण राणे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,9,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,75,प्रेरणादायी कविता,14,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,11,बा भ बोरकर,1,बातम्या,6,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,3,बालकविता,9,बालकवी,1,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बेकिंग,9,भक्ती कविता,8,भाज्या,21,भाताचे प्रकार,13,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,34,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी उखाणे,2,मराठी कथा,92,मराठी कविता,501,मराठी गझल,17,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,12,मराठी टिव्ही,27,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,4,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,41,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,29,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,12,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,330,मसाले,12,महाराष्ट्र,272,महाराष्ट्र फोटो,9,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,19,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेश बिऱ्हाडे,1,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,1,माझा बालमित्र,54,मातीतले कोहिनूर,13,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मुंबई,8,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,यश सोनार,2,यशपाल कांबळे,2,यशवंत दंडगव्हाळ,17,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,4,रजनी जोगळेकर,4,रागिनी पवार,1,राजकीय कविता,6,राजकुमार शिंगे,1,रामचंद्राच्या आरत्या,5,राहुल अहिरे,3,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लता मंगेशकर,1,लक्ष्मण अहिरे,2,लिलेश्वर खैरनार,2,लोणची,8,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,47,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,2,विशेष,4,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,व्यंगचित्रे,15,व्हिडिओ,20,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,5,शांता शेळके,1,शारदा सावंत,4,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,2,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,9,शेती,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीनिवास खळे,1,श्रीरंग गोरे,1,संगीता अहिरे,1,संघर्षाच्या कविता,21,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकाराम,7,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,4,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदेश ढगे,37,संपादकीय,23,संपादकीय व्यंगचित्रे,14,संस्कार,2,संस्कृती,126,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,17,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सदाशिव गायकवाड,2,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,सरबते शीतपेये,8,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सामाजिक कविता,92,सायली कुलकर्णी,5,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सिमा लिंगायत-कुलकर्णी,1,सुदेश इंगळे,3,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुरेश भट,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,2,सैरसपाटा,97,सोमकांत दडमल,1,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,3,स्वाती खंदारे,223,स्वाती दळवी,6,स्वाती नामजोशी,31,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,38,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,1,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,harshad-khandare,1,swati-khandare,1,
ltr
item
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन: विवरणपत्रे - व्यवसायाचे कायदेशीर अस्तित्व
विवरणपत्रे - व्यवसायाचे कायदेशीर अस्तित्व
विवरणपत्रे - व्यवसायाचे कायदेशीर अस्तित्व, अर्थनीति - [Vivaranpatre Vyavasayache Kaydeshir Astitva,Arthniti] वस्तु व सेवाकराचे मासिक विवरणपत्र.
https://1.bp.blogspot.com/-gYIkDWJIzbM/X3WJszY_ABI/AAAAAAAAFnA/B8B2sWjfZu4aJ44fojSKU35ZojLZId_qwCLcBGAsYHQ/s0/vivaranpatre-vyavasayache-kaydeshir-astitva.jpg
https://1.bp.blogspot.com/-gYIkDWJIzbM/X3WJszY_ABI/AAAAAAAAFnA/B8B2sWjfZu4aJ44fojSKU35ZojLZId_qwCLcBGAsYHQ/s72-c/vivaranpatre-vyavasayache-kaydeshir-astitva.jpg
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2020/10/vivaranpatre-vyavasayache-kaydeshir-astitva.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2020/10/vivaranpatre-vyavasayache-kaydeshir-astitva.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची