आठवण ही, ही तुझीच येते, श्वास श्वास होऊनिया, सहवास हे फुल कळ्यांचे, प्रेमस्पर्श होऊनिया
आठवण ही, ही तुझीच येतेश्वास श्वास होऊनिया
सहवास हे फुल कळ्यांचे
प्रेमस्पर्श होऊनिया ॥धृ.॥
आठवण ही तुझीच
तू स्वप्न सोबतीचे
सावली तू अन् माऊलीही तू
आठवण तू आठवणींची ही तू
नजर का बावरे भास भास होऊनिया
आठवण ही तुझी ॥१॥
दिसणे ते हसणे ते
मनडोही डुंबताना खळाळणे ते
गर्द फांदीत पाखरे प्रणयी रंगलेले
रतीमदनाची साथ साथ होऊनिया
आठवण ही तुझी ॥२॥
घालिते पायघड्या काळजाच्या
मखमली तुझिया पावलांना
राधा तू, मीरा तू, अमर तू जाहली
कृष्ण ओठी बासुरी सुर होऊनिया
आठवण ही तुझी ॥३॥
- विवेक जोशी