घुसमट - मराठी कविता

घुसमट, मराठी कविता - [Ghusmat, Marathi Kavita] हृदयी दाटती मेघ, नयनांतून कोसळे पाऊस.
घुसमट - मराठी कविता | Ghusmat - Marathi Kavita

हृदयी दाटती मेघ, नयनांतून कोसळे पाऊस

हृदयी दाटती मेघ
नयनांतून कोसळे पाऊस
सुखदुःखाच्या उनसावलीत
नको वाहवुन जाऊस

जागा दे आसवांना
येऊदे तुफानी लाटा
मनातील रुखरुखेला
मिळुदे सदैव वाटा

नको कालचा पश्चाताप
अन नको उद्याची चिंता
सुखी रहा वर्तमानात
नको उगीचा गुंता

पेरलं तसं उगवतं
ठाव आहे ना तुला
प्रेमाचा बीजांकुर तो
वाढवूया सदाफुला

प्रेम देत, प्रेम घेत
घेवूया जगाला जिंकून
हृदयातील घुसमटीला
टाक सखे फुमंकून


रोहित काळे | Rohit Kale
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

1 टिप्पणी

  1. घुसमट..
    अतिशय सुंदर शब्दात मनात होणारी घुसमट व्यक्त केली आहे..
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.