क्रौंच - मराठी कविता

क्रौंच, मराठी कविता - [Kraunch, Crane, Marathi Kavita] सारेच मग बुडाले, माधुर्य यौवनात, हा पंख छाटलेला, मागुता क्रौंच त्यांत.
क्रौंच - मराठी कविता | Kraunch - Crane - Marathi Kavita

सारेच मग बुडाले, माधुर्य यौवनात

सारेच मग बुडाले । माधुर्य यौवनात ॥
हा पंख छाटलेला । मागुता क्रौंच त्यांत ॥
त्याचीच चोच त्याच्या । पंखांस भार घाली ॥
अन शुभ्रश्या पिसांच्या । जड होत त्यास शाली ॥

जिंव्हा कधीच भुलली । रुची सोवळ्या मीनांच्या ॥
मृदू मीन सरितेचे । अभिसार त्या जलाच्या ॥
आता फक्त जठरा । नीर थंड देत जातो ॥
मोजीत नित घटिका । हर श्वास मीन होतो ॥

डोळ्यांत साठलेले । लघु छानसे विसावे ॥
प्रक्षोभल्या परांनी । घन मेरू शांत व्हावे ॥
वली सावळ्या ढगांच्या । सम त्याच शांत केल्या ॥
काळ्या कभिन्न रात्री । वक्षांत वेढलेल्या ॥

मागे वळून पाही । अति रुद्ध गमन होते ॥
आकाश दिग्विशाल । धीर विजय त्यास भासे ॥
आलोक दाटलेला । जणू अमर इंद्र क्रौंच ॥
तो क्रौं क्रौं करून । जाळी पुनः प्रपंच ॥


रोहित साठे | Rohit Sathe
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.