वडपूजा - मराठी कविता

वडपूजा, मराठी कविता - [Vadpuja, Marathi Kavita] जन्मोजन्मीच्या सौभाग्याच्या, अपेक्षेने गुंडाळलेल्या, दोऱ्यांचा वेटोळा.

जन्मोजन्मीच्या सौभाग्याच्या, अपेक्षेने गुंडाळलेल्या, दोऱ्यांचा वेटोळा

जन्मोजन्मीच्या सौभाग्याच्या
अपेक्षेने गुंडाळलेल्या
दोऱ्यांचा वेटोळा
स्रीत्वाचा ठरलाय
डोलारा मोकळा
करून तारुण्याचा लोळागाळा
स्वप्नांचा केलाय पालापाचोळा
जरी पदर चुरगळला
तरी प्रत्येक स्त्री
साजरा करतेय
वडाला पूजण्याचा
दोरा गुंडाळण्याचा
आणि जन्मोजन्मी
सत्यवान मागणीचा
समारंभ सोहळा

- अनुराधा फाटक

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.