केशर पेढा - पाककृती

केशर पेढा,पाककला - [Keshar Pedha,Recipe] गोड पदार्थ म्हणून सणासुदीला,समारंभाला खाल्ला जाणारा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा केशर पेढा.
केशर पेढा- पाककला | Keshar Pedha - Recipe

समारंभ तसेच सणासुदीचा आवडता गोड पदार्थ म्हणजे केशर पेढा

केशर पेढयासाठी लागणारा जिन्नस
 • २५० ग्रॅम खवा
 • ३ मोठे चमचे साखर
 • थोडसं दुधात घोटलेले केशर
 • गरजेनुसार साजूक तूप
 • ७-८ वेलदोड्याची पूड
 • थोडेसे पिस्त्याचे काप
 • दोन मोठे चमचे गरम दूध

केशर पेढयाची पाककृती
 • खवा कुस्करून घ्या.
 • एका कढईमध्ये साखर व खवा एकत्र करून साखर विरघळेपर्यंत मंद गॅसवर ठेवून ढवळा.
 • साखर विरघळू लागल्यावर त्यामध्ये केशर आणि गरम दूध घालून ढवळत रहा.
 • मिश्रण घट्ट झाल्यावर त्यामध्ये वेलची पूड मिसळा आणि गॅस बंद करून मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
 • मिश्रण घट्ट झाल्यावर हाताला थोडेसे तूप लावून मिश्रणाचे छोटे छोटे गोळे घेऊन त्याचे पेढे बनवा आणि त्यावर पिस्त्याचे काप लावून सजवा.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.