एकतर्फी प्रेमाची कारणमीमांसा भाग ४ - मराठी प्रेम कथा

एकतर्फी प्रेमाची कारणमीमांसा भाग ४, मराठी प्रेम कथा - [Ektarphi Premachi Karanmimansa Part 4, Marathi Prem Katha] मोहीत, वैष्णवी व अमित या तीन कॉलेज तरूणांच्या आयुष्याची प्रेम या अडीज अक्षरासोबत सांगड घालणारी एक अपूर्ण प्रेमकथा.

मोहीत, वैष्णवी व अमित या तीन कॉलेज तरूणांच्या आयुष्याची प्रेम या अडीज अक्षरासोबत सांगड घालणारी एक अपूर्ण प्रेमकथा

घरी आल्यावर मोहित ताडकन आपल्या रूममध्ये जातो. रूमचे दार लावून घेतो. त्याला प्रचंड राग आलेला असतो. तो रागात मोठ्याने ओरडतो व त्याच्या टेबलावरील सर्व साहित्य खाली फेकून देतो. तो आवाज ऐकून त्याचे वडील धावत त्याच्या रूमजवळ येतात. दार ठोठावून त्याला आवाज देतात. “मोहित, मोहित काय करत आहेस दार उघड.” तो त्यांना म्हणतो कि, “बाबा, मला तुमची गरज नाही. ना तुमची ना तुमच्या तत्वज्ञानाची. प्लीज मला एकटे सोडा.” “अरे, असे काय करतोस बाळ. प्लीज दार उघड. हे बघ, तुला तुझ्या आईची शपथ आहे.” ते एका दमात त्याला म्हणतात. मोहित हे ऐकून थोडा शांत होतो व दार उघडतो. तो दार उघडून तसाच पुढे चालत जातो. “काय झाले मोहित? का चिडचीड करतोयस?” त्याचे बाबा त्याला विचारतात. तो टेबलावर दोन्ही हात पसरून हताश होऊन बसलेला असतो व त्याच स्थितीत तो त्यांना विचारतो की, “बाबा, मला हवे तसे कधीच घडणार नाही का?” “म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुला.?” मी त्यांना काही सांगणार इतक्यात मी भानावर आलो. कारण बाबांना सगळं समजलं असतं तर त्यांनी मला लेक्चर द्यायला सुरूवात केली असती. त्यामुळं मी लगेच खोटं कारण शोधायला लागलो. तसा एक खोटा पंच मला आठवला व मी लगेच बाबांना सांगून मोकळा झालो. कोणास ठाऊक त्यांना ते कारण पटले कि नाही. पण त्यांनी माझ्या डोक्यात टपली मारून मला जवळ घेतले. पण मी मनाशी पक्क केलं की जी गोष्ट मला सहजासहजी मिळत नाही. ती मी हिसकावून घेणार.

इकडे अमितच्या व्हॉट्स अ‍ॅप वर वैष्णवीचा मेसेज येतो.
“व्हॉट आर यू डूईंग नाऊ?”

अमित: (स्माईल देत) नाऊ आय एम वॉच मूव्ही फॉर अव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर.
वैष्णवी: शी. सायन्स फिक्शन पाहतोयस. मला वाटलं की एवढे लव्ह बाईट्स मारून मला किस करून तू एखादं रोमॅंटिक लव्ह फिक्शन पाहत असशील.
अमित: वैचारिक मुद्रेचा फनीफेस तिला सेंड करतो व विचारतो, तू काय करत आहेस?
वैष्णवी: मी, अं.. मी सध्या एक रोमॅंटिक मूव्ही बघत आहे.
अमित: बरं...
वैष्णवी: OMG आता एक सुंदर किसींग शॉट सुरू आहे. हा किस पाहिल्यावर मला आपल्या पहिल्या किसची आठवण झाली. मला सांग एवढे डेअरींग तुझ्यात आलं कुठून?
ऑफलाईन गेलेला अमित लगेच ऑनलाईन आला.
अमित: बस फक्त मनाची तयारी केली. बरं पुन्हा कधी आम्हाला एका गोड ओठांची चव घ्यायला मिळेल. असे म्हणत एक किसींग टॅग अमित तिला सेंड करतो.
वैष्णवी: तू काय नेहमी तयारीत असतोस काय?
अमित: मग “आय अ‍ॅम प्रिपेयर बॉय.” बस फक्त कुठे व कधी ते सांग.
वैष्णवी: (त्याच्या उत्तरावर वैष्णवी आपल्या गालाच्या आतील भाग दोन्ही दाढेखाली घेत एका खट्याळ मुद्रेत त्याला म्हणते.) “माथेरान.” तिथल्या थंड व फ्रेश वातावरणात करेन तुझी इच्छा पूर्ण. हां, पण त्यावेळी मी मला हवं तसं किस तुला देईन चालेल.
अमित: अ‍ॅज यू विश मॅम.

अशाप्रकारे त्यांचे प्रेम खुलत असते. चाळीत कधी त्यांची नजर एकमेकांना भिडली तर नजरेने ते एकमेकांना प्रेमाचे इशारे करत असत. पण त्यांना या गोष्टीची पुसटशीही कल्पना नसते की पुढे त्यांच्या आयुष्यात किती गंभीर घटना घडणार आहे.


इंद्रजित नाझरे | Ajit Patankar
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
कादंबरी, कथा वाचनाची आवड असणारे इचलकरंजी, कोल्हापूर येथील इंद्रजित नाझरे हे मराठीमाती डॉट कॉम येथे मराठी कथा या विभागात लेखन करतात.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.