एकतर्फी प्रेमाची कारणमीमांसा भाग ३ - मराठी प्रेम कथा

एकतर्फी प्रेमाची कारणमीमांसा भाग ३, मराठी प्रेम कथा - [Ektarphi Premachi Karanmimansa Part 3, Marathi Prem Katha] मोहीत, वैष्णवी व अमित या तीन कॉलेज तरूणांच्या आयुष्याची प्रेम या अडीज अक्षरासोबत सांगड घालणारी एक अपूर्ण प्रेमकथा.

मोहीत, वैष्णवी व अमित या तीन कॉलेज तरूणांच्या आयुष्याची प्रेम या अडीज अक्षरासोबत सांगड घालणारी एक अपूर्ण प्रेमकथा

स्नेहसंमेलनात वैष्णवीला पाहिल्यापासून मोहित तिच्यासाठी अगदी वेडापिसा झालेला असतो. त्याने तिचे जे फोटो काढलेले असतात. ते सर्व फोटो तो आपल्या पी. सी वर पाहात असतो. तिचा एक पूर्ण फोटो पाहात असताना तो माऊसचा पॉइंटर तिच्या पूर्ण शरीरावर फिरवत असतो. ‘मला हिच्याशी एकदातरी सेक्स करायचा आहे’. ही भावना त्याच्या मनात दाटून येत असते. तो तसाच बेडवर पडतो व त्याच्या मनातल्या भावनांना डोळे बंद करून जिवंत स्वरूप देऊ लागतो.

एकेदिवशी कॉलेजमध्ये कोणीच आलेले नसणार, वैष्णवी एकटीच कॉलेजात आलेली असणार, कोणीच आलेले नाही हे पाहून ती थोडी अचंबीत होणार. आपल्या मैत्रीणींना शोधत ती एका खोलीत येणार, त्या खोलीत मी माझ्या हातात एक गुलाबाचे फूल घेऊन तिला पाठ करून उभा असणार. ती आपल्या मधुर आवाजात मला “कोण?” म्हणून विचारणार. मी तिला वळून पाहिल्यावर ती मला एक छानसं स्माईल देणार. मी तिच्या जवळ जाणार. माझा एक हात तिच्या कमरेत घालून तिला माझ्याजवळ खेचून घेणार. मी माझ्या डोळ्यांत तिचा सुंदर उमदा चेहेरा अगदी सामावून घेणार, ती मला बावरलेल्या नजरेने पाहात असणार. नंतर मी माझ्या हातातले गुलाब फूल तिच्या चेहऱ्यावर अलगद फिरवणार, त्या स्पर्शाने ती आपले डोळे अलगद मिटून घेणार, तिच्या सुंदर ओठांवर माझे गुलाब फूल फिरवून झाल्यावर मी तिच्या मानेवरील केस बाजूला सारून तिचे एक चुंबन घेणार. तशी ती आपले डोळे उघडून मला अलगद बाजूला ढकलून बाहेर पळत सुटणार. मी ही तिच्या मागे पळणार. संपूर्ण कॉलेजमध्ये हा आमचा प्रणय सुरू असणार. वरच्या पॅसेजमधून पळत जात असताना ती मागे वळून पाहणार तेवढयात मी तिला अचानक माझ्याकडे खेचून घेऊन तिला माझ्या मिठीत घट्ट बांधून घेणार. ती कितीही स्वतःला सोडवायचा प्रयत्न करत असली तरी मी तिला माझ्या मिठीतून सोडणार नाही. तिला समोरच्या भिंतीला लागून उभा करणार. माझ्या हाताच्या दोन बोटांनी तिच्या गुडघ्यापासून तिला अलगद स्पर्श करण्यास सुरूवात करणार. त्या स्पर्शाने तीही मोहून जाणार. तिच्या गोड ओठांवरून माझे दोन्ही बोट फिरवत मी तिच्या गालावरचे केस कानाच्या मागे सारून प्रथम तिच्या दोन्ही गालांचे चुंबन घेणार नंतर तिचा चेहरा हाताच्या ओंजळीत धरून तिच्या मऊ ओठांवर माझे ओठ ठेऊन एक दीर्घ चुंबन मी घेणार. नंतर तिला अलगद उचलून एका खोलीत घेऊन जाणार व टेबलावर झोपवून मी त्या खोलीचे दार बंद करून माझी सेक्सची इच्छा पुरेपूर पूर्ण करून घेणार.

[next] हे सर्व आठवत असताना त्याला खालून ‘मोहित मोहित’, अशी त्याच्या बाबांची हाक ऐकू येते. तो खाली जातो. मोहितचे घर अगदीच छोटेखानी स्वरूपाचे असते. सहा वर्षापूर्वी त्याच्या आईचे एका दुर्धर आजाराने निधन झालेले होते. त्याचे वडील आत्माराम गोडबोले हे पेशाने पुरोहित (भटजी) असतात. त्यांना एकुलत्या एक मुलाच्या आयुष्याची चिंता लागून राहिलेली असते. मोहित त्याच्या वडिलांजवळ जातो. “काय झाले बाबा?” मोहित त्यांना विचारतो. ‘मोहित, आज मी ठाण्याला चाललोय. यायला कदाचित उशीर होईल. तू जेवून लवकर झोप.” त्याचे बाबा त्याला सांगतात. तो ठिक आहे, म्हणून जाणार तेवढयात ते त्याला म्हणतात ‘मोहित, थांब.’ तो थांबतो. त्यांना मागे वळून पाहतो. “सर्व काही ठीक आहे ना बाळा?’ ते मोहितला विचारतात. “हो बाबा! पण तुम्ही असे का विचारत आहात.” “नाही. बरेच दिवस झाले तू माझ्याशी मोकळेपणानं बोलला नाहीस.” तो हलकसं हसत बाबांना उत्तर देतो कि, “नाही ते थोडसं अभ्यासाचे टेंशन आहे म्हणून.” ते त्याच्या जवळ जातात. त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला म्हणतात, “मोहित, तू शिकून एक मोठा अधिकारी व्हावास असे तुझ्या आईचे स्वप्न होते आणि तू ते स्वप्न पूर्ण करशील याची खात्री आम्हा दोघांना आहे. कुठल्याही मोहाला बळी पडू नकोस बाळा.” असा उपदेश ते मोहितला करतात व तिथून निघून जातात. मोहित आपल्या खिशात हात घालून त्यांना पाहात उभा राहतो.

इकडे सोसायटीत अमृता दांडेकर या मुलीच्या लग्नाचा बोलबाला सुरू असतो. अमृताची आई सर्वांना पत्रिका वाटत असतात. पत्रिका घेऊन त्या वैष्णवीच्या घरी जातात. “या दांडेकर वहिनी, कसं काय येणं केलंत?” वैष्णवीची आई त्यांना विचारते. “येत्या तीस तारखेला आमच्या अमृताचा शुभविवाह ठरला आहे.” हे ऐकून वैष्णवीच्या आईला फार आनंद होतो. “अय्या, काय सांगताय. अमृताचं लग्न ठरलं.” त्या आनंदाच्या भरात त्यांना म्हणतात. “हो, त्याचीच पत्रिका वाटत आहे.” “वा, थांबा तोंड गोड करते.” तेवढयात वैष्णवी तिथे येते. “बघ वैष्णवी, अमृता ताईचे लग्न ठरलं.” तिची आई तिला सांगते. हे ऐकून वैष्णवीलाही फार आनंद होतो. “म्हणजे आता आम्हाला जिजू (भाऊजी) मिळणार.” ती आनंदाने म्हणते. “काय करतो मुलगा. आणि असतो कुठे?” वैष्णवीची आई दांडेकरकाकूंना विचारते. “इथे नाशिकमध्येच आहे तो. एका कंपनीत आय. टी इंजिनियर आहे. छोटसंच कुटुंब आहे त्यांचे.” असे म्हणून त्या पत्रिका त्यांच्या हातात देतात. “अठ्ठावीस तारखेला हळदीसमारंभ आहे व तीस तारखेला बांद्रा ईस्ट येथील रघू जानकी या हॉलमध्ये लग्न आहे. तेव्हा सहकुटुंब उपस्थित रहा.” असे आमंत्रण देऊन त्या निघून जातात.

[next] संपूर्ण सोसायटीत अमृताच्या लग्नाची चर्चा असते. त्या सोसायटीत सर्वजण एका कुटुंबाप्रमाणे राहात असल्यामुळे अमृताच्या लग्नात सर्वजण आपल्या परीने मदत करत असतात. मंडप बांधणीसह लाईट्स लावणे, फुलांच्या माळा सोडणे इ. कामे सोसायटीतीला तरूण मुले करीत असतात. त्यात अमितचा देखील पुढाकार असतो. आता लग्नसमारंभ आहे म्हणल्यावर तिथे मुलामुलींची रेलचेल असणारच. अशीच एक घटना होते. अमित मंडपाचे खांब बांधत असतो तेव्हा तो एकदम साध्या कपड्यांवर म्हणजेच बनियन व नाईट पॅंटवर असतो. तो जीमला जात असल्याने त्याची शरीरयष्टी मजबूत असते. तिथे वधूपक्षाच्या वर्‍हाडातील एक मुलगी आलेली असते. अमितला अशा रूपात बघून ती आपला डावा हात हॄद्याजवळ घेऊन म्हणते, ‘काय मस्त पर्सनॅलिटी आहे या मुलाची.’ तिचे बोलणे वैष्णवीच्या कानावर पडते. तसा तिला जरा हेवा वाटू लागतो ती अमितजवळ जाते. त्याच्या अंगावर एक कापड टाकते व त्याला म्हणते. “बॉडी न दाखवता देखील कामे केली जातात मि. अमित.” यावर अमित थोडासा गोंधळतो व तिला हसून reply देतो. तशी वैष्णवी त्या मुलीकडे बघून नाक मुरडते व ती मुलगी तिथून निघून जाते.

इकडे मोहितला वैष्णवीच्या रूपाची जादू स्वस्त बसू देत नसते. सतत त्याला तिचा हासरा चेहरा समोर दिसत असतो. त्याला जराही करमत नसते. त्याच्या मनात विचार येतो कि जर हिला प्रपोज करून आपली गर्लफ्रेंड बनवायची असेल तर हिची संपूर्ण माहिती आपल्याला काढावी लागेल. तो आपल्या ओळखीच्या मित्र मैत्रिणींकडून वैष्णवीची संपूर्ण माहिती काढून घेतो व त्याला असे निष्पन्न होते कि ही अंधेरीमधील एका उच्चभ्रू सोसायटीत रहाते व सध्या अमित साठे या मुलाच्या ‘फ्रेंडशीप’ मध्ये आहे. अमित हे नाव ऐकल्यावर तो थोडा विचारात पडतो. नंतर त्याला आठवते कि हा तोच 'आम्या' आहे जो पहिली ते पाचवीपर्यंत माझा क्लासमेट होता. मोहितला त्या दोघांनी शाळेत एकत्र घालवलेले दिवस आठवू लागतात. थोड्यावेळाने त्याला पुन्हा वैष्णवीचा चेहेरा दिसू लागतो व तो तिला मिळविण्याची योजना बनवू लागतो.

[next] आज अमृता दांडेकर हिचा विवाह असतो. तेवढयात वैष्णवीला एक फोन येतो. “हॅलो, काय ग! कुठे गायब झाली आहेस.” नीलमचा रागावलेला सूर ऐकून वैष्णवी थोडी हसू लागते. “हसू नकोस वैष्णवी. तूझा साधा फोन नाही, मेसेज नाही. व्हॉट्स अ‍ॅप देखील बंद आहे तुझं. जरा ऑन कर आणि बघ किती मेसेज पाठविले आहेत मी आणि कविताने.” “अग, हो हो! थोडा श्वास घे. किती बोलशील. बरं कविता कशी आहे.” “ती आहे बरी पण तू कुठे आहेस.” “अगं, ते आमच्या अमृता ताईच्या लग्नाच्या तयारीत आहे म्हणून मला थोडा वेळ मिळाला नाही.” “लग्न नक्की कोणाचे आहे? अमृता ताईचे कि तुझे.” “हं, व्हेरी फनी. फोन ठेवा मॅडम. मी तुम्हाला नंतर फोन करते.” असे म्हणून वैष्णवी फोन कट करते. सर्वजण लग्नाला जाण्यासाठी तयार होत असतात. वैष्णवीही तयार होत असते. तेव्हा तिथे श्री व निकिता येतात. ते दोघेही लग्नाला जाण्यासाठी तयार झालेले असतात. निकिता वैष्णवीला म्हणते, ताई आम्हाला ही एक कविता म्हणून दाखव ना, असे म्हणून ती तिच्यासमोर एक चिठ्ठी पुढं करते. वैष्णवी त्या दोघांना समजावून सांगत असते कि आता आपल्याला बाहेर जायचं आहे. मी नंतर वाचून दाखविते. पण ते दोघेही फार हट्ट करत असतात म्हणून वैष्णवी ती चिठ्ठी उघडून त्यातल्या ओळी वाचू लागते. एक दोन ओळी वाचून झाल्यावर ती मध्येच थांबते व चिठ्ठीतल्या त्या संपूर्ण मजकूराला निरखून पाहू लागते. मजकूर वाचून तिच्या लक्षात येते कि हा तोच फिशपॉंड आहे जो कॉलेजमध्ये कोणत्यातरी मुलगीवर पडला होता. खाली स्वतःचे नाव बघितल्यावर तिला धक्काच बसतो. “तुम्हाला हा कागद कुठे सापडला?” वैष्णवी त्या दोघांना विचारते. श्री तिला म्हणतो कि अमितदादा जिथे काम करत होता तिथे सापडला. यावर क्षणभर तिला काहीच सुचत नाही. नंतर ती त्या दोघांना एक एक टॉफी देते व त्यांना ही गोष्ट बाहेर कुठेही सांगू नका म्हणून बजावते. तसे ते दोघे निघून जातात.

थोडावेळ वैष्णवी खुर्चीवर बसून विचार करते नंतर तिचे लक्ष अमितच्या रूमकडे जाते. तिला थोडे थोडे समजू लागते कि अमितचं आणि माझं मैत्रीचं नातं एक वेगळ्याचं वळणावर जात आहे व याबाबत अमितशी बोलायला हवं म्हणून ती ‘मला लग्नाच्या हॉलमध्ये जावं लागेल अमित मला तिथेच भेटेल’ असे म्हणून ती आवरू लागते. सोसायटीतील सर्वजण हॉलमध्ये उपस्थित असतात. अमित हा पाहुण्यांचे स्वागत व अक्षता वाटप करायला दोन तीन मित्रांसोबत प्रवेशद्वारावर उभा असतो. पण नंतर काही कामासाठी त्याला आत जावे लागते. तेवढयात वैष्णवी आपल्या आई वडिलांसोबत तिथे येते. गुलाबी रंगाची साडी, केसांचा गजरावेणीसोबत घातलेला अंबाडा. या वेशभूषेत ती खूप सुरेख दिसत असते. हॉलमधील सर्व मुलांच्या नजरा तिच्यावरच असतात. पण तिची नजर अमितला शोधत असते. काही वेळानंतर काळ्या रंगाचा सलवार कुर्ता घातलेला अमित तिच्या नजरेस पडतो. पण ती अमितशी काहीच न बोलता निघून जाते. लग्न सोहळा पार पडतो. जेवायला ही दोघे समोरासमोर बसलेले असतात अमित तिला पाहून एक स्माईल देतो पण वैष्णवी मात्र त्यावर डोळे मोठे करून त्याला पाहते. अमितला काहीच कळत नाही कि ती अशी का वागत आहे. तो एकदोन वेळा तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो पण व्यर्थ. ती त्याला काहीच प्रतिसाद देत नाही. शेवटी अमित वैतागून एका खुर्चीवर बसतो. थोड्या वेळानंतर निकीता अमितजवळ वैष्णवीचा निरोप घेऊन जाते कि संध्याकाळी सात नंतर वैष्णवी दिदीने त्याला टेरेसवर भेटायला बोलावले आहे. तिचा निरोप ऐकून अमितला थोडे हायसे वाटते. पण थोडी काळजी ही वाटू लागते.

[next] हळूहळू लग्नाचा हॉल रिकामा होऊ लागतो. सर्वजण आपआपल्या घरी जाऊ लागतात. अमित घड्याळाकडे टक लावून पाहत असतो. सात वाजताच तो टेरेसवर जाऊ लागतो. टेरेसवर पोहोचताच तो आजूबाजूला नजर फिरवून कोणी आहे का ते पाहतो. अमित कट्टयावर हात ठेवून उभा राहतो. खाली त्याचे मित्र त्याला गेम खेळायला बोलवत असतात पण तो त्यांना इशार्‍याने आज नाही म्हणून सांगतो. तेवढयात पाठीमागून त्याला तो फिशपॉंडचा मजकूर ऐकू येतो.

“तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझं
सारं आयुष्यच बदलून गेले भकास अशा
वाळवंटात कोवळे फूल उमलू लागले.
आपले नाते निखळ मैत्रिचे त्याला वासनेची
जोड नाही तुझ्या माझ्या मैत्रिला कोणत्याही
फॉर्मॅलीटीज ची गरज नाही.”
- तुझा प्रिय मित्र अमित. Love वैष्णवी.

अमितला यावर काय बोलायचं ते सुचत नसते. वैष्णवी मागे हात बांधून त्याच्याजवळ येते. क्षणभर शांतता पसरते. अमित खाली मान घालून उभा असतो. तर वैष्णवी त्याच्याकडे एका विशिष्ट नजरेने पाहत असते. “व्हॉट इज धिस अमित? हे काय आहे?” वैष्णवी त्याला विचारते. अमितच्या मनात विचार येतो कि हीच खरी वेळ आहे आपले प्रेम तिला सांगण्याची. तो काहीच बोलत नाही हे पाहून वैष्णवी तिथून जाणार इतक्यात “आय लव्ह यू वैष्णवी.” अमित एका झटक्यात बोलून टाकतो. वैष्णवी सुन्न होऊन त्याला पाहत असते. “होय. माझं तुझ्यावर प्रेम आहे.” यावर लगेच वैष्णवी त्याच्या गालावर हलकेच चापट लगावते. अमित पुन्हा तिच्या डोळ्यात डोळे घालून ‘आय लव्ह यू’ म्हणतो. ती पुन्हा त्याला चापट लगावते. जवळपास तीन वेळा हा प्रकार तिथे होतो. चौथ्या सिच्यूएशनला वैष्णवी तिथून जाणार तेवढयात अमित तिचा हात धरून आपल्याकडे खेचतो आणि तिच्या ओठांचे एक गोड चूंबन घेतो.

[next] वातावरण एकदम शांत होते. अचानक वैष्णवी अमितला ढकलून बाजूला करते व मोठमोठ्याने श्वास घेत त्याला म्हणते, “अमित, आपल्या मैत्रीच्या नात्यात हा वेगळा पॉईंट कुठून आला.” अमित यावर म्हणतो कि “हे मलाही माहित नाही गं. पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.” वैष्णवी त्याच्यापासून दोन पावले मागे जात त्याला म्हणते “पण अमित हे केवळ एक शारीरिक आकर्षण देखील असू शकते.” अमित तिच्याजवळ जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेऊन म्हणतो कि “नाही वैष्णवी. माझं फक्त तुझ्या सौंदर्यावर किंवा शरीरावर प्रेम नाही. मी तुझ्यावर अगदी मनापासून प्रेम करतो.” पण अमित ती बोलत असते तेवढयात अमित तिच्या ओठांवर बोट ठेऊन शू... आता काहीच बोलू नकोस. ती तिथून थोडे लांब जाऊन त्याला म्हणते, “पण अमित, आपण कधीच एकत्र राहू शकणार नाही.” “पण का?” अमित तिला उद्विगतेने विचारतो. ती एक मोठा श्वास घेऊन त्याला म्हणते, “मी जातीने ब्राम्हण आणि तू एक ब्राम्हणेतर. ‘सॉरी टू से धीस’. आपल्या घरचे कधीच परवानगी देणार नाहीत.” ती हताशपणे म्हणते. अमित आपल्याजागी शांत उभा राहून तिला म्हणतो, “तू जर माझ्या प्रेमाला होकार दिलास तर मी संपूर्ण जगाशी लढायला तयार आहे. बाकीच्यांच मला माहित नाही. पण माझ्या घरचे तुला सून म्हणून नक्की स्वीकारतील.” दोन्ही हात पसरून तो वैष्णवीला म्हणतो. “त्यांनाही वाटेल ना! कि एखाद्या सुंदर सुसंस्कृत मुलीचे पाय आपल्या उंबरठ्याला लागू देत.” अमितच्या या आत्मविश्वासक बोलण्याने तिचे डोळे भरून येतात व ती धावत येऊन अमितला मिठी मारते.

हळूहळू त्यांच्या कॉलेजमधील फ्रेंड सर्कलमध्ये देखील ही गोष्ट पसरू लागते कि अमित व वैष्णवी हे दोघं लव्हशीपमध्ये आहेत. ग्रूपमधील सर्वजण त्या दोघांना “लव्हबर्डस्” म्हणून ओळखू लागतात. त्या दोघांनी एक फोटो तयार केलेला असतो. फोटोमध्ये वैष्णवी आपला एक पाय त्रिकोणी अवस्थेत ठेऊन व दुसरा पाय पसरून अमितला खेटून बसलेली आहे व अमित तिचा हात आपल्या हातात धरून बसला आहे. अशाप्रकारच्या “लव्ह” पोजिशनमध्ये ते दोघे बसलेले असतात. दोघांनाही आपआपल्या फेसबूक डिपीला तो फोटो अ‍ॅड केलेला असतो. असेच दोन दिवस निघून जातात. एकेदिवशी अमित सकाळी लवकर कॉलेजला जातो. खरं तर दोघांना एकत्रच जायचे असते पण काही कारणाने वैष्णवीला उशीर होतो. कॉलेजात दोनतीन लेक्चर होतात नंतर बाकीचे लेक्चर्स ऑफ पडतात. अमित, नीलम, कविता व अक्षय कॉलेजच्या लॉनवर वैष्णवीची वाट पाहत बसलेले असतात. वैष्णवी घराबाहेर पडते. घरापासून दोनतीन किलोमीटर अंतरावर आल्यावर तिची स्कूटी अचानक बंद पडते. ती डोक्यावरचे हेल्मेट काढून स्कूटी पुन्हा स्टार्ट करून पाहते. पण ती स्कूटी काही केल्या स्टार्ट होत नाही. अमितला फोन लावायचा विचार तिच्या मनात येतो. ती मोबाईलसाठी आपला हात खिशाकडे नेते. पण यायच्या गडबडीत ती मोबाईल घरी विसरलेली असते. ती पुन्हा आपल्या सॅकमध्ये मोबाईल चेक करते पण नाही सापडत. पुन्हा स्कूटी स्टार्ट करायला पाहते. पण स्कूटीदेखील स्टार्ट होत नसते. सर्वबाजूंनी निगेटिव्ह कंडिशन आल्याने ती हतबल होऊन हुंदके देत रडू लागते.

[next] तेवढयात तिला पाठीमागून आवाज येतो कि “एनी प्रॉब्लेम मॅडम?” ती लगेच स्तब्ध होऊन आपले अश्रू पुसत मागे पाहते तर मोहित त्याच्या बाईकवर बसलेला तिला दिसतो. ती पाहताक्षणी त्याला ओळखते कि हा तोच मुलगा आहे जो मला कॉलेजवर भेटला होता. इकडे अमित व बाकीचे सगळे वैष्णवीची वाट पाहून अगदी वैतागून जातात. अमित तिचा फोन वारंवार ट्राय करत असतो. मोहित तिला विचारतो. “काय झालं तुमची गाडी बंद पडली आहे का?” वैष्णवी मिरर मध्ये बघत आपले अश्रू पुसत त्याला होकारार्थी पद्धतीने मान हलवून हो म्हणून सांगते. मोहित आपल्या बाईकवरून खाली उतरतो. तो तिच्या बाईकजवळ जातो. गाडीची चावी घेऊन पेट्रोलची टाकी उघडून बघतो तर पूर्ण पेट्रोल संपलेले असते. तो तिला हसून सांगतो कि “मॅडम तुमच्या गाडीतील पेट्रोल संपले आहे.” हे ऐकून वैष्णवीला धक्का बसतो व सौरभ या तिच्या भावाचा फार राग येतो. कारण रात्री त्यानेच तिची गाडी फिरवायला घेतलेली असते.

“शिट यार. ही अजून कशी आली नाही.” अमित वैतागून म्हणतो. “पण तुम्ही दोघे एकत्र येणार होता ना?” नीलम त्याला विचारते. “हो. येणार होतो. पण तीच मला म्हणाली मला वेळ लागेल तू जा पुढे.” अमित नीलमला म्हणतो. या सर्व मित्रांना दोन चार दिवसांसाठी माथेरानला जायचे असते व ते या चर्चेसाठी वैष्णवीची वाट पाहत असतात. पण ती इथे अडकलेली असते. मोहित तिला दुसर्‍यांदा विचारतो कि “मॅडम, मी तुम्हाला कॉलेजवर सोडू का? मीही तिकडेच जात आहे.” “नो थॅंक्स. मी ऑटो किंवा बेस्टनी जाईन.” ती त्याला म्हणते व इकडेतिकडे नजर फिरवू लागते. पण ती ज्या रोडवर उभी असते तिथे कन्सट्रक्शनचे काम सुरू असते. टू व्हिलर सोडून बाकी कोणत्याही इतर वाहनांना तिथे प्रवेश नसतो हे जेव्हा तिच्या लक्षात येते तेव्हा ती मनात स्वतःलाच दोष देत बसते. मोहित डोळ्यावर गॉगल चढवत पुन्हा एकदा तिला विचारतो. ती एका खांद्यावर सॅक अडकवून खाली मान घालून उभी असते. वैष्णवी त्याला काहीच उत्तर देत नाही हे पाहून मोहित आपले दोन्ही हात वर करून “ठीक आहे. जशी तुमची इच्छा.” असे म्हणून बाईक स्टार्ट करून तो तिथून निघणार इतक्यात वैष्णवी त्याला म्हणते “एक्स्कूझ मी”. “मोहित माझं नाव.” तो तिला म्हणतो. “आय एम सॉरी. मी तुमच्याशी असे वागायला नको होतं. अं तुम्ही मला कॉलेजवर सोडू शकता का प्लीज.” वैष्णवी त्याच्या जवळ जाऊन त्याला म्हणते. “इट्स् ओके मॅडम. तुम्ही गाडीवर बसा.” मोहित तिला म्हणतो.

[next] सुरूवातीला ती उजवीकडे तोंड करून सॅक मांडीवर घेऊन बसते. मोहित गाडी सुरू करतो. त्यांची गाडी एका रोडवर येते. खड्डे चुकविताना वैष्णवीचा तोल सतत जात असतो. मोहित तिला म्हणतो, “मॅडम, तुम्ही कंफरटेबल स्थितीत बसता का?” ती त्याला “इट्स् ओके” असे म्हणते पण पुन्हा तेच घडते. मोहित आपली गाडी साईडला घेतो व तिला म्हणतो कि “मॅडम, प्लीज तुम्ही रिलॅक्स होऊन बसू शकता.” वैष्णवीचाही नाइलाज होतो व ती सॅक पाठीला अडकवून दोन्ही पाय उजवीकडे व डावीकडे टाकून त्याच्या बाईकवर बसते. त्यालाही हेच हवे असते. आता तो बाईक थेट कॉलेजच्या दिशेने घेतो. मोहितची बाईक कॉलेजच्या गेटमधून आत येते. लॉनवर बसलेल्या कविताला ते दिसते. ती नीलमला म्हणते कि “नीलम, हा तर तो मोहित गोडबोले आहे ना.” “हां तोच आहे. पण वैष्णवी याच्याबरोबर येत आहे.” नीलम कविताला म्हणते. दोघींच्याही चेहऱ्यावर प्रश्नांकित भाव आलेले असतात. मोहित गाडी थांबवतो. वैष्णवी गाडीवरून खाली उतरते. ती त्याला थॅंक्स असे म्हणते. तो तिथून जाणार तेवढयात वैष्णवी त्याला म्हणते, “एक मिनिट. तुम्ही आला आहात तर तुमची ओळख माझ्या मित्रमैत्रिणींशी करून देते.” तो ही तिच्याबरोबर चालू लागतो. तेवढयात अमित वैष्णवीला धावत येऊन मिठी मारतो. “किती उशीर केलास यायला? तुझा फोनही लागत नव्हता? मी आणि अक्षय तुझ्या घरी जाणार होतो.” हे प्रश्न ऐकतच ती त्याच्या मिठीतून बाहेर येते. मोहित हे सर्व एका कूत्सित नजरेने पाहत असतो. ही पहिलीच वेळ असते जेव्हा मोहित व अमित हे दोघे तब्बल दहा वर्षानंतर एकमेकांसमोर आलेले असतात. वैष्णवी अमितला रिलॅक्स करते व उशिरा येण्याचे कारण सांगते कि गाडीतील पेट्रोल अचानक संपले व मला यांच्याकडून लिफ्ट घेऊन यावे लागले, ती मोहितकडे हात करत सांगते.

अमित त्या दिशेकडे पाहतो तर तिथे कुणीच नसते. “अरे कुठे गेला?” वैष्णवी त्याला इकडेतिकडे शोधू लागते. “तो तर गेला.” नीलम तिला सांगते. “पण असं कसं. मी त्याला थांब म्हणून सांगितलं होतं.” वैष्णवीला असं अप्सेट झालेलं बघून अमित तिला म्हणतो शू... शू! वैष्णवी कोण होता तो. ती त्याला म्हणते, “अरे तो अं ‘मोहित गोडबोले’.” हे नाव ऐकल्यावर अमित थोडा विचारात पडतो. “अरे अमित. तो रे त्यादिवशी गॅदरींगला फोटो काढायला आला होता.” कविता त्याला सांगते. “नाही. मी नाही त्याला पाहिलं. पण हे नाव कुठेतरी ऐकल्यासारख वाटत आहे. बरं आता आल्या आहेत ना मॅडम आपण ट्रीपविषयी बोलूया का?” अक्षय त्या सर्वांना म्हणतो. ते सर्वजण लॉनवर बसतात व माथेरान या पिकनिकपॉईंटवर कधी जायचं या विषयावर चर्चा करू लागतात.

मोहित मात्र आपली बाईक फुल स्पीडने चालवत असतो. त्याला सतत अमित व वैष्णवी या दोघांच्या मिठीचे दृश्य समोर दिसत असते. त्याच्या मनात अमितबद्दल वाईट शब्द येऊ लागतात व तो तसाच घरी निघून जातो.


इंद्रजित नाझरे | Ajit Patankar
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
कादंबरी, कथा वाचनाची आवड असणारे इचलकरंजी, कोल्हापूर येथील इंद्रजित नाझरे हे मराठीमाती डॉट कॉम येथे मराठी कथा या विभागात लेखन करतात.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.